तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:35 IST2022-05-26T12:15:49+5:302022-05-26T13:35:09+5:30
आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.

तिलारी घाटात मालवाहू कंटेनरला अपघात, ..अन् मोठा अनर्थ टळला
दोडामार्ग : तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने मालवाहू कंटेनरला अपघात झाला. कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला अन् मोठा अनर्थ टळला. काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.
मालवाहू कंटेनर हरियाणा येथून माल भरून दोडामार्ग ते कोल्हापूर-बेळगाव मार्गावरून गोव्याकडे निघाला होता. तिलारी घाटातील धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने जय पॉईंट येथे हा कंटेनर कठड्याला धडकून कोसळता कोसळता वाचला. या घाटातून अवजड वाहनाना बंदी असताना परराज्यातील वाहने गोवा जवळ असल्याने तेथून प्रवास करतात. आंबोली घाटात अवजड वाहनाना बंदी असतानाही धोकादायकरीत्या वाहतूक होत असते.
तिलारी घाटातील जय पॉईंट येथील चड उतार यू आकाराचे वळण धोकादायदायक आहे. संपूर्ण उतार असून दरीच्या तोंडावर टर्न मारावा लागतो. हे अनोळखी वाहन धारकांच्या लक्षात येत नाही आणि अशा प्रकारे अपघात होतात. या ठिकाणी गेल्या काही वर्षात एसटी बस, खासगी वाहनांना अपघात झाला आहे. काही जणांचा बळी देखील गेला आहे.