भरधाव वेगाने दुचाकी झाडावर आदळली, वेंगुर्लेतील युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 17:18 IST2022-01-28T17:17:44+5:302022-01-28T17:18:04+5:30
अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्यामुळे दुचाकी आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली

भरधाव वेगाने दुचाकी झाडावर आदळली, वेंगुर्लेतील युवकाचा मृत्यू
कुडाळ : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी-काळेपाणी परिसरात रात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. महेंद्रकुमार सुवालाल सैनी (वय-१९, रा.मठ-गावठणवाडी,वेंगुर्ले) असे त्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती मुकेशकुमार जगदीशप्रसाद सैनी याने कुडाळ पोलिसात दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, मयत महेंद्रकुमार हा आपल्या दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात होता. यावेळी अवघड वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या भल्यामोठ्या आंब्याच्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात चालक महेंद्रकुमार याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.
दरम्यान याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानुसार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर घटनेचा अधिक तपास शिंदे करीत आहेत.