लग्न होत नसल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल, डोक्यात गोळी मारुन संपवले जीवन

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 12, 2023 11:47 IST2023-04-12T11:47:25+5:302023-04-12T11:47:51+5:30

घटनेने तालुक्यात उडाली एकच खळबळ

A young man from Achara in Sindhudurga ended his life by shooting himself in the head as he could not get married | लग्न होत नसल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल, डोक्यात गोळी मारुन संपवले जीवन

लग्न होत नसल्याने युवकाने उचलले टोकाचे पाऊल, डोक्यात गोळी मारुन संपवले जीवन

आचरा (सिंधुदुर्ग) : स्वतःचे लग्न होत नसल्याने सिंधुदुर्गातील आचरा येथील युवकाने डोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. संबंधित युवकाने डोक्यात गोळी मारुन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर भालचंद्र मुळये (वय-३६) असे या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

याबाबत माहिती अशी की, चंद्रशेखर भालचंद्र मुळये याचे लग्न होत नव्हते. यामुळे तो तणावाखाली होता. अखेर चंद्रशेखरने टोकाचा निर्णय घेत ठासणीच्या बंदूकीने डोक्यात गोळी मारुन घेत जीवन संपविले. मठबुद्रूक लिंग्रसवाडी येथे काल, मंगळवारी ही घटना घडली. याबाबतची माहिती वडील भालचंद्र रघुनाथ मुळये यांनी आचरा पोलिस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक बगडे, पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.
 

Web Title: A young man from Achara in Sindhudurga ended his life by shooting himself in the head as he could not get married