Sindhudurg news: मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 27, 2023 16:06 IST2023-03-27T16:05:45+5:302023-03-27T16:06:09+5:30

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही

A young man committed suicide by hanging himself in Malvan Ozar | Sindhudurg news: मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Sindhudurg news: मालवण-ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मालवण (सिंधुदुर्ग) : ओझर येथे आंब्याच्या झाडास एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. निलेश गोविंद तोंडवळकर (४२ रा. तोंडवळी वरची) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

स्थानिकांना तसेच अन्य दुचाकीस्वारांना सकाळच्या सुमारास ओझर रस्त्यालगत असणाऱ्या आंब्याच्या झाडाला एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हा मृतदेह निलेश तोंडवळकर यांचा असल्याचे समजताच त्यांचा भाऊ गणेश तोंडवळकर ग्रामस्थांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. 

निलेश तोंडवळकर हे आज सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते स्थानिकांना ओझर येथून दुचाकीवरून जाताना दिसले. ओझर हायस्कूलच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी लावलेली दिसून आली. १० वाजण्याच्या सुमारास ओझर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना, स्थानिक ग्रामस्थांना आंब्याच्या झाडास त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A young man committed suicide by hanging himself in Malvan Ozar