Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 24, 2024 16:21 IST2024-08-24T16:20:06+5:302024-08-24T16:21:51+5:30
मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे झाला अपघात

Sindhudurg: कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक, दोघा युवकांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग : मुंबई - गोवा महामार्गावर वागदे येथील एका हॉटेलनजीक पहाटे २.३० वाजता उभ्या असलेल्या कंटेनरला पाठिमागून दुचाकीची जोराची धडक होवून दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. संकेत नरेंद्र सावंत (वय २४, कणकवली परबवाडी) व साहिल संतोष भगत (२३, कणकवली विद्यानगर) अशी मृतांची नावे आहेत. कणकवली शहरातील या दोन्ही युवकांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
याबाबत माहिती अशी की, मुंबई गोवा-महामार्गावर एका हॉटेलनजीक कंटेनर महामार्गावर उभा असताना कणकवली येथुन ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या या दुचाकीची पाठिमागून कंटेनरला धडक झाली. अपघाताची माहिती कणकवली पोलिस व जिल्हा वाहतूक पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी संकेत सावंत व साहिल भगत बेशुध्द अवस्थेत पडले होते. पोलिसांनी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले.