दोडामार्ग जवळ चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:22 IST2022-05-25T12:22:22+5:302022-05-25T12:22:45+5:30
या आगीत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे.

दोडामार्ग जवळ चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
सावंतवाडी : दोडामार्ग जवळ साळ-गोवा येथे चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. मात्र दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरुन उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज, बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. रवी हरिश्चंद्र रेडकर (रा.खोलपेवाडी), असे दुचाकी चालकाचे नाव आहे.
रवी रेडकर हा खोलपेवाडी येथील घराकडून आपल्या दुचाकीने दोडामार्ग बाजारपेठेकडे येत होता. खोलपेवाडी-दोडामार्ग च्या हद्दीवर येताच दुचाकीच्या सायलन्सर मधून अचानक मोठा धूर येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तेव्हा त्याने तात्काळ दुचाकी थांबवली. दुचाकीला आग लागल्याचा अंदाज येताच काही क्षणात दुचाकीवरून बाजूला होत रेडकर यांने पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. मात्र तोपर्यंत आगीने दुचाकीला घेरले होते. गोवा-डिचोली येथील अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले होते. तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली.