शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:42 IST

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ...

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील खनिज साठ्यांच्या उत्खननाला ग्रामस्थांचा विरोध होऊ नये याकरिता सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम भाजपचे मंत्री व नेतेमंडळींकडून सुरू आहे. हा कुटील डाव सिंधुदुर्गवासीयांनी हाणून पाडण्यासाठी लढा दिला पाहिजे. या लढ्यात काँग्रेस पक्ष जिल्हावासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. वागदे येथील गोपुरी आश्रामाला सपकाळ यांनी भेट दिली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंत व सामाजिक चळवळींमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अॅड. संदीप निंबाळकर, डॉ. मंगेश सावंत आदी उपस्थित होते.     सपकाळ म्हणाले, तोडा-फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. याविरोधात काँग्रेसचा लढा सुरु आहे.  राणे-पित्रापुत्र सत्तेत असल्याने त्यांनी जिल्ह्यात पुन्हा राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू लागला आहे. तो बिघडू नये म्हणून परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी या दहशतवादविरोधात लढाई सुरु केली पाहिजे. या लढाईत काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून लढेल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होताना दिसत आहे. पक्ष संघटनेचे नेटवर्क मजबूत होण्यासाठी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी कृती कार्यक्रम दिले जाणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष नव्या उमेदीने वाटचाल करीत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष गाव ते राष्ट्रीय पातळीवर पुन्हा गतवैभव प्राप्त करेल. सिंधुदुर्गातील विचारवंत, परिवर्तन चळवळीतील मंडळी, सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या जनहितार्थ असलेल्या उपक्रमांमध्ये आणि भाजपविरोधी लढ्यात पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या संवादा दरम्यान भाजपचे मंत्री व नेते हे एका धर्माला टार्गेट करीत आहेत. त्यांची ही कृती निषेधार्ह आहे, असे ऍड. संदीप निंबाळकर म्हणाले. काँग्रेस पक्षाने परिवर्तनवादी, समाजवादी चळवळींशी व सामाजिक संस्थांशी कनेक्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी सपकाळ यांचे गोपुरी आश्रमाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशामुक्ती मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, साहित्यिका सरिता पवार, दादा कुडतरकर आदी उपस्थित होते.सदभावना पदयात्रा काढणार बिघडलेला सामाजिक सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष लवकरच जिल्ह्यात सदभावना पदयात्रा काढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळMahayutiमहायुतीBJPभाजपा