शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

Sindhudurg: मार्लेत हत्तीच्या कळपाचा महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न, घाबरुन महिला पडली बेशुद्ध; सुदैवाने जीव वाचला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 27, 2024 1:20 PM

दोडामार्ग : काजू बागेतून घरी परतणाऱ्या महिलांवर हत्तींच्या कळपाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरुन एक ...

दोडामार्ग : काजू बागेतून घरी परतणाऱ्या महिलांवर हत्तींच्या कळपाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरुन एक महिला बेशुद्ध पडली. पल्लवी भगवान गवस (वय-२८) असे तिचे नाव असून साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोर्ले येथे काल, शुक्रवारी ही घटना घडली. मोर्ले केर परिसरात सद्या हत्तींचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हत्ती आणखीनच आक्रमक झाले आहेत. लोकवस्तीत येण्याबरोबरच माणसांवर हल्ले चढवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी जातात. काल शुक्रवारी भाग्यश्री गवस व त्यांची जाऊ पल्लवी गवस या काजू बागेतून संध्याकाळी उशिरा घरी परतत होत्या. दरम्यान हत्तींच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यात पल्लवी गवस या घाबरुन भीतीने बेशुद्ध पडल्या. त्यांना साटेली- भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सद्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने याघटनेत जिवीतहानी टळली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभाग