कणकवली बांधकरवाडी येथे जि.प शाळेच्या परिसरात लागली आग
By सुधीर राणे | Updated: February 15, 2023 14:25 IST2023-02-15T14:25:10+5:302023-02-15T14:25:36+5:30
कणकवली : कणकवली बांधकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नं २ च्या परिसरात आज, बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागली. दरम्यान, ...

कणकवली बांधकरवाडी येथे जि.प शाळेच्या परिसरात लागली आग
कणकवली : कणकवली बांधकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नं २ च्या परिसरात आज, बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागली. दरम्यान, नजीकच्या गवताला लागून आग भडकली. कचरा जाळण्यासाठी अज्ञात व्यक्तीने ही आग लावली होती, मात्र आगीत परिसरातील झाडे जळाली.
आग वाढत जावून शाळेच्या इमारतीला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे तत्काळ शिक्षकांनी नगरसेवक अभिजित मुसळे यांना याबाबत माहिती दिली. मुसळे यांनी नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी नेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.