शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात ९२३१ जोडण्या

By admin | Updated: October 21, 2014 23:38 IST

महावितरण हायटेक : संगणकीकृत व्यवहार सुरू झाल्याने कामाला वेग

रत्नागिरी : महावितरणकडून मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येत आहे. महावितरणकडून सर्व व्यवहार संगणकीकृत करण्यात आल्याने वीज जोडणीसाठी अर्जही आॅनलाईन करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात महावितरणकडून जिल्ह्यात ९२३१ वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत.घरगुती वीज जोडण्या रत्नागिरी विभागात ३७०४, चिपळूण विभागात २११८, खेड विभागात १६६२ तर जिल्ह्यात एकूण ७४८४ जोउण्या देण्यात आल्या आहेत. वाणिज्य जोडण्या रत्नागिरी विभागात ५५५, चिपळूण विभागात २६१, खेड विभागात २३३ तर जिल्ह्यात १०४९ जोडण्या देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पथदीपांच्या रत्नागिरी विभागात ६३ ,चिपळूण विभागात ३५, अशा जिल्ह्यात एकूण ९८ जोडण्या देण्यात आल्या आहेत. शेतीपंपाच्या रत्नागिरी विभागात २२५, चिपळूण विभगात ८६, खेड विभागात ११४ अशा संपूर्ण जिल्ह्यात एकूण ४२५ जोडण्यात देण्यात आल्या आहेत. लघुदाब वाहिनीवरील औद्योगिक वीज जोडण्या ६८ देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात ३९, चिपळूण विभागात १३, खेड विभागात १६ जोडण्या देण्यात आल्या आहेत. लुघदाब वाहिनीवरील अन्य ५३ जोडण्या देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात ३३, चिपळूण विभागात ७, खेड विभागात २२ जोडण्या देण्यात आल्या आहेत. उच्च दाब वाहिनीच्या औद्योगिक वीज जोडण्यात रत्नागिरी विभागात २ तर खेड व चिपळूण विभागात प्रत्येकी एक मिळून एकूण ४ जोडण्यात देण्यात आल्या आहेत. तर उच्च दाब वाहिनीवरील जिल्ह्यातील एकमेव वीजजोडणी चिपळूण विभागात देण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार होत असून जिल्ह्यात सेकंड होमसाठी परजिल्ह्यातील ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे सहाजिकच दरवर्षी वीजजोडण्या वाढत असल्याचे दिसत आहे. महावितरणने कामकाज पारदर्शी व्हावे यासाठी संगणीकृत पध्दतीने कार्यालये जोडली आहेत. त्यामुळे मागणीसुध्दा वाढत आहे. महावितरणकडून सध्या दरमहा सरासरी १५०० वीज जोडण्या देण्यात येत आहेत. तरीही जिल्ह्यात घरगुती ५५६४, कृषी पंप ९३७, औद्योगिक ११४, सार्वजनिक पाणीपुरवठा ९२, पथदीप ८८, उच्चदाब औद्योगिक ६ वीजजोडण्या अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित वीजजोडण्या देण्याचे काम सुरू असून लवकरच त्या १०० टक्के पूर्ण केल्या जातील, असे कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता एस.पी. नागटिळक यांनी दिले. या जोडण्याबद्दल ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)महावितरणकडून मागेल त्याला वीज जोडणीआॅनलाईन व्यवहार कायम सहा महिन्यातील प्रगती समाधानकारक वीज जोडण्यांचे प्रमाण वाढतेय वाणिज्य व्यवहारासाठीही वेगळा प्रयोग महावितरण कडून कामगिरी