Local Body Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल; वेंगुर्ला, कणकवलीची पाटी अद्याप कोरीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:18 IST2025-11-14T15:17:35+5:302025-11-14T15:18:02+5:30
Local Body Election: नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी

Local Body Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल; वेंगुर्ला, कणकवलीची पाटी अद्याप कोरीच
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यात नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या गुरूवारी (दि.१३) चौथ्या दिवशी जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या सदस्यपदासाठी एकूण ८ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
यात सावंतवाडी नगरपरिषदेत सर्वाधिक ५, मालवण नगरपरिषदेत ३ अर्ज दाखल झाले आहेत. तर वेंगुर्ला आणि कणकवली नगरपंचायतीत कोणताही अर्ज दाखल झालेला नाही. सादर झालेल्या सर्व ८ अर्जांची नोंद ऑनलाईन पद्धतीने झाली असून, ऑफलाईन स्वरूपात सावंतवाडी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी सीमा मठकर यांचा एक अर्ज दाखल झाला आहे.
आता नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहेत. जिल्ह्यात अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. प्रत्यक्षात काही जणांनी प्रचार करायला सुरूवात केली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबतचे घोंगडे भिजत पडले आहे.