शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी नंबरसाठी मोजलेत ६८ लाख रूपये

By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST

किरण बिडकर : महसूली उत्पन्नात भर; रिक्षाचा टप पिवळ्या रंगाचा ठेवण्याचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : आपल्या वाहनांचा नंबर व्हीआयपी असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र या एका व्हीआयपी नंबरला लाखो, हजारो रूपये मोजावे लागतात. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षात वाहनधारकांनी व्हीआयपी नंबरवर तब्बल ६८ लाख रूपये मोजले असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली आहे.जिल्ह्यात नववर्ष, गुढीपाडवा, वाढदिवस, गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, अक्षय्य तृतीया या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. वाहन पासिंग झाल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाला उत्सुकता असते नंबरची.प्रत्येक वाहनधारकाला वाटत असते की आपल्याला एखादा चांगला व व्हीआयपी नंबर मिळावा. मात्र या व्हीआयपी नंबरला अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याने काही वाहनधारक पैसे मोजून आपल्याला हवा तो नंबर घेतात तर वाहनधारक आरटीओ जो नंबर देईल त्या नंबरवर समाधान मानतात.वाहनधारकांना नंबरची बेरीज २७ किंवा समअक्षरी येण्यासाठी नंबरची आगाऊ बुकींग करतात. तर मोठे वाहनधारक हे आपल्याला १, २, ७, ९, ९९९, १०००, १०१, ११११ या नंबरसाठी हजारो, लाखो रूपये खर्चून नंबर खरेदी केला जातो. या एका नंबरसाठी ६० ते ७० हजार रूपये किंमत आहे. काहीजण लकी नंबर म्हणून तर काहीजण व्हीआयपी नंबरसाठी पैसे मोजायला मार्ग पुढे पाहत नाहीत.उपप्रादेशिक परिवहन विभागाला शासनाकडून दरवर्षी २६ ते २७ कोटी रूपये महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट दिले जाते. त्याची पूर्तताही या विभागामार्फत होताना दिसते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हीआयपी नंबरसाठी वाहनधारकांनी तब्बल ६७ लाख ७० हजार ५०० रूपये आरटीओ कार्यालयाकडे मोजल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे महसूली उत्पन्नात यामुळे भर पडण्यास मोठी मदत होतआहे. (प्रतिनिधी)वाहतुकीचे नियम पाळले जावेत व आॅटोरिक्षांमध्ये एकसुत्रता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ हजार ६२८ परमीटधारक रिक्षाचालकांना आपल्या रिक्षाचा टप पिवळ््या रंगाचा असावा, याबाबत सक्त आदेश देण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली. सिंधुदुर्गात ९६२८ परमीट व अन्य रिक्षा आहेत. मात्र यातील जवळजवळ सर्वच रिक्षांचा टप हा काळा, पांढरा व निळ््या रंगाचा असतो. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व रिक्षांमध्ये वाहतुकीचे नियम पाळले जावेत व आॅटोरिक्षांमध्ये एकसुत्रता यावी, यासाठी सर्व रिक्षाधारकांनी आपल्या रिक्षाचा टप पिवळा करणे आवश्यक आहे. याबाबतचे तोंडी आदेशही संबंधित रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत.रिक्षाधारक जेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभागात फिटनेस सर्टिफिकेटसाठी येईल त्यावेळी रिक्षाला पिवळा रंग आवश्यक आहे, अशी माहितीही यावेळी किरण बिडकर यांनी दिली. त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील वेगवेगळ््या रंगात असणाऱ्या रिक्षा आता एकाच पिवळ््या रंगात दिसणार आहेत.