शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

कणकवली शहर शहर विकासासाठी पाच कोटींचा निधी : रवींद्र चव्हाण यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 5:05 PM

कणकवली शहर आदर्श बनविण्यासाठी तसेच येथील सर्वांगीण विकासासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाचे शासन आल्यावर या शहरासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे, असे नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण येथे म्हणाले.

ठळक मुद्देकणकवली शहरासाठी कोट्यवधींचा निधी : चव्हाण नगरपंचायतीत भाजपची सत्ता येण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्न करणार

कणकवली : कणकवली शहर आदर्श बनविण्यासाठी तसेच येथील सर्वांगीण विकासासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाचे शासन आल्यावर या शहरासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला आहे.  अजून ५ कोटींचा निधी मुख्यमंत्र्यानी मंजूर केला असून तो लवकरच नगरपंचायतीला मिळेल. असे सांगतानाच कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी विजयाच्यादृष्टीने सर्व पदाधिकारी संघटितरित्या सर्वतोपरी प्रयत्न करतील. असा ठाम विश्वास नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, अतुल काळसेकर, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, राजश्री धुमाळे, जयदेव कदम, राजन म्हापसेकर, राजू राऊळ, बंड्या मांजरेकर, हनुमंत सावंत, दीपक सांडव, महेश सावंत, यशवंत आठलेकर, प्रभाकर सावंत, सीमा नानिवडेकर, प्रज्ञा ढवण, गीता कामत, जयश्री आडीवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कणकवली नगरपंचायतीला शासनाकडून मिळालेल्या निधीतून होणाºया विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच काही कामांचे उदघाट्न शुक्रवारी करण्यात आले आहे. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील सुचविलेल्या कामांची परिपूर्ती भाजपच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जनतेला विविध सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.शहराबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री आग्रही आहेत. त्यामुळे ते विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाहीत.ते पुढे म्हणाले, पाच जिल्ह्यांचा भाजपचा संपर्कमंत्री म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यात माझा संपर्क सुरु असतो. भाजपची विचारसरणी पटणारे इतर पक्षातील लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सर्वत्र शत-प्रतिशत भाजप झाला पाहिजे यासाठी आमचे संघटीटरित्या प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. असेही मंत्री चव्हाण यावेळी म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिला पाहिजे यासाठी अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान सुरु आहे. व लोकांचाही त्याला प्रतिसाद मिळत आहे.नगरपंचायतीचा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून यावा ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व संदेश पारकर यांची मागणी होती ती आता पूर्ण होत आहे. संदेश पारकर व त्यांचे बंधू कन्हैया पारकर नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यामुळे त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद नेहमीच मिळत असल्याचेही ते म्हणाले.युतीबाबत निर्णय निवडणूक कार्यक्रमानंतरकणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाबरोबर युती करायची का? याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर घेतील. भाजप जिल्हा कोअर कमिटीचे याबाबतचे मतही यावेळी विचारात घेतले जाईल. असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.विकासाच्या मुद्यावर निवडणूकयावेळी संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहरासाठी आतापर्यंत भाजप शासनाकडून १० कोटीहून अधिक निधी देण्यात आला आहे. विकासाच्या मुद्द्यावर कणकवली नगरपंचायत निवडणूक लढविली जाणार आहे. तसेच पुढील पाच वर्षात शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी किमान पाच विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला.भाजपमध्ये गटबाजी नाहीसिंधुदुर्ग जिल्हा भाजपात कोणतीही गटबाजी नाही. येथे कोणीही नेते नाहीत सर्वच कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते म्हणूनच ते मोठे झाले आहेत. माझे येथील सर्वच पदाधिकाºयांशी मैत्रीचे संबध आहेत. येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी एकदिलाने, एकविचाराने प्रयत्न करीत आहेत. असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.जिल्ह्यात रोजगार निर्मितीचे नियोजनच्कणकवली शहरातील सांडपाणी समस्या कायमची सोडविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील.च्कणकवलीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री नियोजन करीत आहेत.च्विकासाबाबत आम्ही जे जे ठरविले होते ते सत्ता आल्यानंतर केले आहे. आगामी काळात अनेक विकास कामे पूर्णत्वास गेलेली दिसतील.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गministerमंत्रीBJPभाजपा