Sindhudurg: पत्रादेवीत गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 11, 2024 17:58 IST2024-03-11T17:57:56+5:302024-03-11T17:58:31+5:30

सिंधुदुर्ग : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ...

4 lakh worth of goods including Goa-made liquor seized in Patradevi Sindhudurg, one arrested | Sindhudurg: पत्रादेवीत गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

Sindhudurg: पत्रादेवीत गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

सिंधुदुर्ग : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ४४० रुपयांच्या दारूसह दीड लाखांची कार असा एकूण ४ लाख ३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जुना पत्रादेवी-बांदा रोड, पोस्ट ऑफिसजवळ येथे करण्यात आली. महेश कृष्णा दाभोलकर (रा. सावंतवाडी) असे संशयिताचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाने जुना पत्रादेवी-बांदा रोड, बांदा पोस्ट ऑफिस जवळ येथे सिल्व्हर रंगाची चारचाकी वाहनाची तपासणी केली असता यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे ४४ खोके अवैध साठा मिळून आला.

याप्रकरणी महेश दाभोलकर याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यामध्ये २ लाख ५३ हजार ४४० रुपयांची दारू व १ लाख ५० हजार किमतीची गाडी असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दीपक वायदंडे, प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास प्रदीप रास्कर करीत आहेत.

Web Title: 4 lakh worth of goods including Goa-made liquor seized in Patradevi Sindhudurg, one arrested