शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sidhudurg ZP Election 2026: सिंधुदुर्गात भाजपचा बिनविरोध पॅर्टन सुसाट, किती जणांनी मारली बाजी.. जाणून घ्या

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 27, 2026 19:41 IST

विरोधकांना जोरदार धक्का

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच ५० पैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर पंचायत समितीच्या १०० जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत.भाजपाचे खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आलेल्या २५ सदस्यांमध्ये भाजपाचे ७ जिल्हा परिषद सदस्य आणि १६ पंचायत समिती सदस्यांसह २३ जण बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिंदेसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध झाला आहे. जिल्ह्यात भाजपासह महायुतीचा बिनविरोध पॅटर्न सुसाट असल्याचे पहायला मिळाले.जिल्हा परिषद, पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक ५ फेब्रुवारीला होत आहे. यानिमित्ताने उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारीच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या जिल्ह्यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यातही पक्ष नेतृत्वाला यश आले आहे.

जिल्हा परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य१. खारेपाटण : प्राची ईस्वलकर (भाजप), २. बांदा : प्रमोद कामत (भाजपा), ३.जानवली : रूहिता राजेश तांबे (शिंदेसेना), ४. पडेल : सुयोगी रवींद्र घाडी (भाजप), ५. बापर्डे : अवनी अमोल तेली (भाजप), ६. पोंभुर्ले : अनुराधा महेश नारकर (भाजप), ७. किंजवडे : सावी गंगाराम लोके (भाजप), ८. कोळपे : प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप).

पंचायत समितीचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य१. पडेल : अंकुश यशवंत ठुकरूल (भाजप), २. नाडण : गणेश सदाशिव राणे (भाजप), ३. बापर्डे : संजना संजय लाड (भाजप), ४. फणसगाव : समृद्धी संतोष चव्हाण (भाजप), ५. शिरगाव : शितल सुरेश तावडे (भाजप). ६. कोटकामते : ऋुतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप), ७. कोकिसरे : साधना सुधीर नकाशे (भाजप), ८. आसोली : संकेत धुरी (भाजप). ९. आडवली मालडी : सीमा सतीश परूळेकर (भाजप). १०. शेर्ले : महेश धुरी (भाजप). ११. कोलझर : गणेशप्रसाद गवस (शिंदेसेना). १२. वरवडे : साेनू सावंत (भाजप), १३. नांदगाव : हर्षदा वाळके (भाजप). १४. जानवली : महेश्वरी महेश चव्हाण (भाजप). १५. बिडवाडी : संजना संतोष राणे (भाजप), १६. हरकुळ बुद्रुक : दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप), १७. नाटळ : सायली संजय कृपाळ (भाजप).

हुकूमशाहीकडे वाटचालजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून राबविला जाणारा ‘बिनविरोध’ निवडणुकीचा पॅटर्न लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. विविध आमिषे दाखवून किंवा दबावतंत्राचा वापर करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. सर्वसामान्य नागरिक भविष्यात मतदानापासून दूर जाण्याची भीती आहे. - अनिल केसरकर, मनसे जिल्हाध्यक्ष. 

पराभवाला घाबरून अनेकांची माघारजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार राबवित असलेल्या विकास अजेंड्यामुळे सूज्ञ मतदार महायुतीच्या पारड्यात आपले बहुमूल्य मत टाकेल. उद्धवसेनेने बळजबरीने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांना आपला पराभव समोर दिसत असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. - प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Unopposed Win Streak in Sindhudurg ZP Election 2026

Web Summary : Sindhudurg ZP sees unprecedented 8 unopposed wins out of 50 seats, plus 17 Panchayat Samiti seats. BJP leads with 23 unopposed members under Rane's leadership, while Shinde Sena secures two. Mahayuti's unopposed pattern gains momentum as elections approach.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे