शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

वाळूत लपवून ठेवलेली व्हेल माशाची १९ किलोची उलटी जप्त, मालवण पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:58 IST

तस्करीचे किनारपट्टीवरील कनेक्शन अद्यापही समोर आलेले नाही

मालवण : तालुक्यातील तळाशील येथे वाळूत लपवून ठेवलेले तब्बल १८.६०० किलोंचे अम्बरग्रीस अर्थात व्हेलची उलटी मालवण पोलिसांनी जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेलच्या उलटीला मोठी किंमत असल्यामुळे तिची तस्करीसुद्धा केली जाते. अशा तस्करीत सिंधुदुर्गातील एकाला सांगलीत अटक करण्यात आली आहे.तळाशील येथील नीलेश रेवणकर यांच्याकडे अंबरग्रीससदृश कोणता तरी पदार्थ असल्याची माहिती सागररक्षक संजय तारी यांनी पोलिसांना दिली होती. यावरून मालवणचे पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच. व्ही. पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पोलिसांच्या पथकाने नीलेश रेवणकर यांच्याकडे संबंधित पदार्थाबाबत चौकशी केली असता तो पदार्थ वाळूत लपविलेला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी तो पदार्थ वाळूतून बाहेर काढत त्याचा पंचनामा केला. यावेळी वनविभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याबाबत वनविभागाची संपर्क साधला असता, तळाशील येथे सापडलेला तो पदार्थ व्हेल माशाची उलटीच आहे का, हे तपासण्यासाठी वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत, याचीही याद्वारे तपासणी होणार आहे.अनेक प्रकरणे समोरबुधवारी सांगली येथे पावणेसहा कोटी रुपये किमतीची व्हेलची उलटी पोलिसांनी जप्त केली. या कारवाईत सिंधुदुर्गातील एकाला अटक करण्यात आली आहे. बऱ्याचदा व्हेलच्या उलटीची तस्करी करणारे सांगली, पुणे, नाशिक या भागांत सापडून आल्याची मागील दोन वर्षांत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र या तस्करीचे किनारपट्टीवरील कनेक्शन अद्यापही समोर आलेले नाही. याबाबत किनारपट्टीवरील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस