शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत १४० स्वच्छतागृह

By admin | Updated: November 16, 2014 23:49 IST

जिल्हा परिषद : १ कोटी ४० लाखांचे अनुदान मंजूरे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या १४० प्राथमिक शाळांसाठी स्वच्छतागृहे मंजूर करण्यात आली आहेत़ या स्वच्छतागृहांचे बांधकाम सर्वशिक्षा अभियानाच्या अनुदानातून करण्यात येणार आहे़ खासगी शैक्षणिक संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद आदिंच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे असणे अवश्यक आहेत़ त्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृहे देण्यात आली आहेत़ जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७०० प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये सुमारे १० हजार शिक्षक विद्यादानाचे काम करीत आहेत़ तर सुमारे दिड लाख विद्यार्थी शिकत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानांतर्गत शाळा, शासकीय कार्यालये, कुटुंबांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्यही करण्यात येत आहे़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची सोय करुन देण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून अनुदानाची उपलब्धता करुन देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील १४० प्राथमिक शाळांसाठी सर्वशिक्षा अभियानातून स्वच्छतागृहांना मंजूरी देण्यात आली आहेत़ मंजूर करण्यात आलेल्या प्रत्येक स्वच्छतागृहासाठी एक लाख रुपयांचे अनुदान सर्वशिक्षा अभियानातून देण्यात येणार आहे़ त्यासाठी शिक्षण विभागाने पहिला हप्प्ता म्हणून प्रत्येक शाळेसाठी निम्मी रक्कम म्हणजेच ५० हजार रुपये शाळांकडे वर्ग करण्यात आली आहे. या स्वच्छतागृहांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सर्व स्वच्छतागृहांसाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते़ यामधील ५० टक्के रक्कम शाळांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर उर्वरित रक्कम लवकरच शाळांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले़ (शहर वार्ताहर)स्वच्छतेचा ध्यास ं जिल्ह्यात स्वच्छतेचा ध्यास घेऊन निर्मल भारत अभियान जोरदार राबविण्यात आले. या अभियानामध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या , शासकीय कार्यालये यांच्यामध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व शिक्षा अभियानातूनही स्वच्छतागृह नसलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधकामांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील एकही शाळा यापासून वंचित राहणार नाही.सर्वशिक्षा अभियानातून १ कोटी ४० लाख रुपये मंजूर५० टक्के रक्कम शाळांकडे वर्ग शिक्षण विभागाचा सहभाग स्वच्छतागृहांची बांधकामे लवकर सुरू होणारप्रत्येकी १ लाखाचे अ़नुदान तालुका मंजूर शौचालये मंडणगड१४ दापोली२२ खेड ०४ चिपळूण४७गुहागर०९संगमेश्वर१३रत्नागिरी१३लांजा ९ राजापूर ९एकूण१४०