ओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:23 IST2021-04-02T16:22:03+5:302021-04-02T16:23:46+5:30
Fraud Crimenews Sawantwadi Sindhudurg- बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

ओटीपी विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा
सावंतवाडी : बँकेमधून बोलत असल्याचे भासवित ओटीपी क्रमांक विचारून तब्बल १ लाख ६३ हजार २१६ रुपयाला गंडा घातला. मोईन मुबारक नाईक (रा. निरवडे) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या युवकाने पोलीस ठाण्यात येत याबाबतची माहिती दिली असून, अज्ञात युवकाविरोधात गुरुवारी सायबर क्राईमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपण एका बँकमधून बोलत आहे, असे सांगत एका अज्ञाताने फोन केला तसेच ओटोपी नंबर विचारत त्याच्या खात्यातून तब्बल पावणेदोन लाख रुपये काढले. या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने थेट सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले व घडलेली हकिगत सांगितली. पोलिसांनी सायबर अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे.