पुणे: पुण्यातील एफ.सी. रोडवर थरार; नोकरी गेल्याच्या नैराश्यातून व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल
पुणे - शहरातील गजबजलेल्या एफ.सी. रोड परिसरात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. खाऊ गल्ली परिसरात एका व्यक्तीने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रीय: गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी BJP कार्यकर्त्यांचे मानले आभार
नवी दिल्ली: पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत विजयाचे श्रेय त्यांच्या दीर्घकाळाच्या परिश्रमांना दिले. पश्चिम बंगालमधील भाजपची ही ऐतिहासिक कामगिरी अनेक पिढ्यांपासून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळेच शक्य झाली आहे. मी सर्वांना सलाम करतो, असे उद्गार पीएम मोदींनी काढले.
व्यापार: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या २४ कॅरेट सोन्याची किंमत
आज(दि.४) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत सोने १,९०६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे दर कमी झाल्याने भारतीयांना दिलासा मिळाला.
व्यापार: ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक, कसा होता लक्ष्मी मित्तल यांचा प्रवास?
IPL च्या इतिहासात रविवारी एक मोठा करार करण्यात आला. दिग्गज उद्योजक लक्ष्मी मित्तल आणि त्यांचा मुलगा आदित्य मित्तल यांनी अदर पूनावाला यांच्यासोबत मिळून राजस्थान रॉयल्ससाठी १.६५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. मित्तल कुटुंबीयांकडे या टीमचा सर्वाधिक म्हणजेच ७५ टक्के हिस्सा आहे. राजस्थानच्या एका छोट्या ठिकाणाहून बाहेर पडून स्टीक कंपनी उभी करणारे आर्सेलर मित्तल आज अब्जावधींचे मालक आहेत.
व्यापार: ३० वर्षांत पहिल्यांदाच घडले! एप्रिल महिन्यात कुवेतने तेलाचा एकही बॅरल निर्यात केला नाही, कारण काय?
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. टँकर ट्रॅकर्सच्या अहवालानुसार, कुवैतने एप्रिल २०२६ मध्ये कच्च्या तेलाचा एकही बॅरल निर्यात केलेला नाही. गेल्या तीन दशकांत पहिल्यांदाच कुवैतसाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर या वृत्ताची अधिकृत पुष्टी झाली, तर १९९१ मधील खाडी युद्धानंतर कुवैतच्या इतिहासात पहिल्यांदाच मासिक कच्च्या तेलाची निर्यात शून्यावर आल्याची नोंद होईल.
राष्ट्रीय: थलापतीचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीचे निकाल आज(दि.४) लागत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, सत्ताधारी DMK ला जोरदार धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांच्या TVK पक्षाने १०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.
व्यापार: थलापति विजय : अभिनेता, राजकारणी आणि ६०० कोटींच्या साम्राज्याचे मालक, कशी आहे लक्झरी लाईफ?
अभिनेता-राजकारणी थलापति विजय, TVK चे प्रमुख, यांनी निवडणुकीपूर्वी ६०० कोटींहून अधिकची संपत्ती जाहीर केली. ते पेरंबूर आणि तिरुचिरापल्लीतून निवडणूक लढवत आहेत. विजयची संपत्ती चित्रपट, जाहिरात आणि रिअल इस्टेटमधून आहे. त्यांची पत्नी संगीता यांच्याकडेही मोठी मालमत्ता आहे, जी त्यांच्या राजकीय प्रभावाला बळकटी देते.
राष्ट्रीय: भाजपला तीन राज्यांमध्ये यश पण दोन राज्यांत फक्त ५ जागांवर आघाडी
भाजपला आसाम, बंगालमध्ये मोठं यश मिळालं असलं तरी तामिळनाडू, केरळात निराशा झाली आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्यावेळीपेक्षा केवळ पाच जागांवरच भाजपला आघाडी मिळाली आहे.
लातुर: लातूर पोलिसांची जनजागृती: अपघातग्रस्त BMW हायवेवर; वेग झाला कमी
लातूर पोलिसांनी भीषण अपघातानंतर रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी महामार्गावर अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू लटकवली. वेग आणि सीटबेल्ट दुर्लक्षित केल्याने होणारे अपघात कमी करणे, विशेषतः ब्लॅकस्पॉटवर, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.
राष्ट्रीय: मोफत सोने, जमीन अन् दरमहा २५०० रूपये; विजय यांच्या आश्वासनांची भूरळ
अभिनेता विजय यांच्या टीवीके पक्षाला तामिळनाडूात घवघवीत यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीपूर्वी विजय यांच्या पक्षाने मोफत सोन्यापासून बरीच आश्वासने लोकांना दिली होती. विजय यांच्या आश्वासनामुळे तामिळनाडूत एम.के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाची १० वर्षाची सत्ता उलथावून लावली आहे. तामिळनाडूत लग्न करताना प्रत्येक मुलीला ८ ग्रॅम सोने सरकारकडून देण्यात येईल ही घोषणा निवडणुकीत प्रचंड गाजली होती.
क्रिकेट: IPL 2026: पंजाब किंग्जचा पराभव; श्रेयस अय्यर खेळपट्टीवर नाराज
गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. श्रेयस अय्यरने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली, असमान उसळीमुळे फलंदाजी कठीण झाल्याचे सांगितले. संघर्षपूर्ण धावसंख्या उभारूनही, खेळपट्टीमुळे संघाला अपेक्षित खेळ करता आला नाही, असे तो म्हणाला. यातून सकारात्मक गोष्टी घेऊन पुढे जाऊ, असे अय्यरने सांगितले.
व्यापार: लग्नसराईदरम्यान सोनं-चांदी स्वस्त; काय आहेत नवे दर? पाहा
आज सोने आणि चांदीच्या किमतीत झालेली घट लग्नसराईत खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी ठरू शकते. ४ मे २०२६ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचा भाव १,५१,०८३ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,५१,१९४ रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज अमेरिकेपासून भारतापर्यंतच्या वायदा बाजारात घसरण दिसून येत असून घरगुती सराफा बाजारातही हीच स्थिती आहे.
व्यापार: SBI कडून ५० लाखांचं होम लोन हवंय, किती असावा लागेल पगार?
भारतीय रिझर्व्ह बँकेनं एप्रिलमध्ये झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे होम लोन, कार लोनसह इतर सर्व प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कोणतीही सूट मिळाली नाही, मात्र यामुळे ग्राहकांची निराशाही झाली नाही.
फिल्मी: 'धुरंधर'ला 'प्रोपागंडा' म्हणणाऱ्यांना जावेद अख्तर यांचे उत्तर
‘धुरंधर’ फ्रँचायझीवर 'प्रोपागंडा' चित्रपट असल्याचा आरोप करत काहींनी टीका केली. आता या वादावर ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून त्यांनी या चित्रपटाचे जाहीर कौतुक केले आहे. ते म्हणाले की, "मला माहित नाही की प्रोपागंडा चित्रपट म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, पण मला 'धुरंधर' चित्रपट खूप आवडला. हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. तांत्रिकदृष्ट्या सांगायचं झालं तर मला या फ्रँचायझीचा पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा जास्त आवडला.प्रत्येक चित्रपटाची आणि कथेची स्वतःची एक विचारधारा असते. केवळ एखाद्या वर्गाला ती कथा आवडली नाही म्हणून त्याला 'प्रोपागंडा' म्हणणे चुकीचे आहे."
क्राइम: डॉक्टर महिलेवर अत्याचार, Video व्हायरल करण्याची धमकी देत मागितली खंडणी
कोल्हापूर येथे डॉक्टर महिलेच्या घरी पतीला भेटायला आल्याचे सांगत तरुणाने जबरदस्ती केली. या घटनेचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर स्नॅपचॅटवर व्हिडिओ पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडितेने शनिवारी रात्री याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
व्यापार: कॅनरा बँकेत १ लाख जमा करा, ९५,३०० रुपये निश्चित व्याज मिळवा
कॅनरा बँक ही भारताची एक सरकारी बँक आहे. कॅनरा बँकेकडे केवळ मोठ्या संख्येनं ग्राहकच नाहीत, तर देशभर त्यांच्या अनेक शाखा देखील आहेत. देशातील मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेली कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (FD) योजनेवर जबरदस्त नफा मिळवून देत आहे. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना एफडी खात्यांवर ३.०० टक्क्यांपासून ७.६० टक्क्यांपर्यंत बंपर व्याज देत आहे.
राष्ट्रीय: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
चार राज्यांसह एका केंद्र शासित प्रदेशामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळात सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या मतमोजणी फेऱ्या पूर्ण पडल्यानंतर कलांचे आकडे जाहीर केले आहेत. यात तीन पश्चिम बंगालमध्ये भाजपा, तर तामिळनाडूमध्ये टीव्हीकेने मुसंडी मारली आहे.
नाशिक: खरातच्या बनावट धनादेशांचे बोगस खात्यांशी कनेक्शन; ईडीचा तपास.
अशोक खरातने पीडितांचे धनादेश आणि बोगस खाती वापरून पैसे लपवले. वारंवार पैसे फिरवून मूळ स्रोत लपवला. पत्नीच्या खात्यावरही करोडो जमा. ईडी तपास करत आहे.
पुणे: मुलींची सुरक्षा कागदावरच; गुन्ह्यांचे आकडे वाढले, पुणे हादरले
महाराष्ट्रामध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. पुणे शहरात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ. 2024-25 मध्ये राज्यात 94 हजार महिला बेपत्ता. पुण्यात लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या घटना उघडकीस.
क्रिकेट: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनं उत्तुंग षटकार मारत गुजरात टायटन्सच्या संघाला ४ विकेट्सनी विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह २ गुण खात्यात जमा करत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने १२ गुणांची कमाई करत प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पंजाबच्या संघाचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा पराभव असून १३ गुणांसह ते अजूनही गुणतालिकेत अव्वलस्थानावर विराजमान आहेत.
क्रिकेट: मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवत सलग तिसऱ्या विजयासह प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवल्या आहेत. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेनसह जलदगती गोलंदाज कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीसमोर पहिल्यांदा फलंदाजी करताना तगडी फलंदाजी असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ १६५ धावांत गारद झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशीच्या हिट शोनंतर रिंकूच्या फिनिशिंग टचसह कोलकाता नाईट रायडर्सने विजय निश्चित केला.
अन्य क्रीडा: लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
ऑलिम्पियन महिला कुस्तीपटू आणि काँग्रेस आमदार विनेश फोगाट आणि बृजभूषण शरण सिंह यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनेशने गंभीर आरोप करत सांगितलं आहे की, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी लैंगिक शोषण केलेल्या सहा पीडित महिला कुस्तीपटूंपैकी मी देखील एक आहे. जंतर-मंतरवरील महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा राहिलेल्या विनेश फोगाटने रविवारी ३ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःची ओळख उघड केली आहे.
क्रिकेट: सुनील नरेन: आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज!
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेन याने आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने सलिल अरोराला बाद करत आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला. नरेन हा IPL इतिहासात २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे. एकंदरीत विचार करता IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा तो युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यानंतर तिसरा गोलंदाज आहे.
महाराष्ट्र: "माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे सरकारवर संतापले
"आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही?", असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी महायुती सरकारला घेरले. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये येथील एका चिमुकलीवर झालेल्या घटनेनंतर अमित ठाकरे यांनी एक पोस्ट करत पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला.
क्रिकेट: IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
KKR कडून यंदाच्या हंगामात पहिली संधी मिळताच मनीष पांडेने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत एलिट क्लबमध्ये प्रवेश केला. २००८ पासून प्रत्येक IPL हंगामात किमान एक सामना खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. पांडे IPL मध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
पुणे: ‘मुलगा होत नाही’ म्हणत पतीकडून सतत मारहाण;पत्नीने ६ वर्षांच्या चिमुकलीसह संपवलं आयुष्य
राजगुरुनगर : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून वारंवार करण्यात येणारी मारहाण आणि सतत होत असलेल्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने तिच्या लहान मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे: तू फक्त माझीच..नाहीतर कोणाचीच नाही; पुण्यात तरुणीवर जीवघेणा हल्ला करून प्रियकर पसार
पुणे : प्रेम प्रकरणात झालेल्या वादातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुणे: ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
पुणे / नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
परभणी: पुलाचा अंदाज चुकल्याने अपघात, तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू.
गंगाखेडजवळ पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने धीरज जगलपूरे यांच्या कारला अपघात झाला. रात्रीच्या अंधारात गाडी पलटी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
पिंपरी -चिंचवड: आमच्या जगण्याचा आधार हिरावला...? चिमुरड्याचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा
पिंपरी : पोलिसांनी कुलूप तोडून खोलीतील सुटकेस उघडली. त्यात तीनवर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळला. दुपारपासून चिमुरड्याच्या शोधात असलेल्या आईची तगमग वाढली होती. आपल्या निरागस चिमुरड्याचा मृतदेह पाहताच तिच्या संयमाचा अंत झाला. ‘आमच्या जगण्याचा आधार हिरावला, आता आम्ही कोणासाठी जगू,’ असे म्हणत तिने हंबरडा फोडला. त्यामुळे पोलिसांसह कामगार चाळ गलबलून गेली.
पुणे: ‘गुन्हेगार मोकाट, यंत्रणा झोपेत!’ नसरापूरची चिमुकली ठरली पोलिस-न्यायव्यवस्थेच्या अपयशाची बळी
पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. भीमाजी कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) या विकृत प्रवृत्तीच्या आरोपीने एका निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. या घटनेने समाजमन सुन्न झाले असले, तरी त्याहून मोठा धक्का म्हणजे ही दुर्घटना टाळता आली असती, अशी चर्चा आता जोर धरत आहे.