मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ!
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत एक दिवसाची मुदतवाढ! आझाद मैदानातील उपोषण उद्यापर्यंत सुरू राहणार. पोलिसांनी काही अटींसह परवानगी वाढवली, वाहतूक कोंडी टाळण्याचा इशारा दिला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा जरांगेंचा निर्धार!
राष्ट्रीय: २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
पश्चिम आशियातील तणावातून मार्ग काढत २०,००० टन एलपीजी घेऊन जहाज भारतात पोहोचले. 'सिमी' जहाजाने अमेरिकन आणि इराणी सैन्याला हुलकावणी देत, सरकारी मदतीने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. मार्चपासून झालेली ही 13 वी यशस्वी खेप आहे.
पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल
पुणे : मुंढवा येथील चाळीस एकर सरकारी जमिनीच्या बेकायदा विक्री प्रकरणात सहआरोपी अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
पुणे: नसरापूर अत्याचार प्रकरण: आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र शनिवारी दाखल करण्यात आले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याने तपासाची गती आणि कार्यपद्धती विशेष ठरली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पुढील आठवड्यात या प्रकरणाची ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती दिली.
राष्ट्रीय: अधिकाऱ्याच्या घरी धाड: बेहिशेबी संपत्ती पाहून तपास यंत्रणा चक्रावल्या
बिहारमधील अधिकारी गोपाल कुमार यांच्या मालमत्तेवर धाड टाकरण्यात आली. त्यावेळी त्यांच्या संबंधित ठिकाणावरून करोडोंची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली, ज्यात रोख, सोने, मालमत्तेची कागदपत्रे, आलिशान गाड्यांचा समावेश आहे. उत्पन्नापेक्षा ८१.५% जास्त मालमत्ता आढळल्याने अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
व्यापार: नेदरलँड्सच्या सहकार्याने भारतात सेमीकंडक्टर प्लांट: पंतप्रधान मोदी
टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एएसएमएल यांच्यात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी भागीदारी झाली आहे. गुजरातच्या धोलेरा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सेमीकंडक्टर प्लांट उभारला जाईल, ज्यामुळे भारताची स्थिती सुधारेल आणि 'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन मिळेल.
राष्ट्रीय: राजधानी एक्सप्रेसला आग: दिल्ली-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत
त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (१२४३१) ला रविवारी पहाटे मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील अलोर परिसरात अचानक आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. दिल्लीकडे जात असलेल्या या ट्रेनला पहाटे ५.३०च्या सुमारास लुणी-रीछा आणि विक्रमगडदरम्यान आग लागली.
क्रिकेट: IPL 2026: एका T20 सामन्यात सहा अर्धशतके, बनला वर्ल्ड रेकॉर्ड
कोलकाताने गुजरातला हरवले. टी20 इतिहासात पहिल्यांदाच सहा फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. एकाच टी-२० सामन्यात तब्बल सहा फलंदाजांनी ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरला.
राष्ट्रीय: मान्सून अंदमानमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी? विदर्भात उष्णतेची लाट
मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. तो मे अखेरीस केरळमध्ये आणि 6 जूनच्या आसपास महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची लाट असूनही, महाराष्ट्रात मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. अमरावती आणि वर्ध्यात उच्च तापमान नोंदवले गेले.
महाराष्ट्र: तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणी तुरुंगात असलेल्या अशोक खरातला सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या कुटुंबीयांना जमिनीचा मोबदला मिळेल, त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. निलंबित अधिकाऱ्याच्या पत्नीचाही यात सहभाग असल्याची माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय: आपत्तींचे दशक, गरिबीच्या खाईत: पंतप्रधान मोदींचा जगाला इशारा.
जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटामुळे जगाला आपत्तींचे दशक असून प्रगती उलटून लोक गरिबीत ढकलले जाण्याची शक्यता आहे, असा इशारा पंतप्रधान मोदींनी हेग येथे दिला. त्यांनी भारतातील संधी, स्टार्टअप वाढ आणि नवोन्मेष संस्कृतीचा उल्लेख करत भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीवर भर दिला.
क्रिकेट: IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
IPL 2026, KKR vs GT : फिन ॲलन, अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीनच्या वादळी खेळीनंतर सुनील नरेनच्या फिरकीतील जादुच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 'करो वा मरो'ची लढाई जिंकली. २४८ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलरनं तगडी फाईट दिली. पण मोक्याच्या क्षण सुनील नरेन याने कर्णधार गिलची विकेट घेतली आणि सामना कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं फिरवला. GT चा विजय रथ रोखत २९ धावांनी सामना जिंकत KKR नं प्लेऑफ्सची आस कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय: लुक-आऊट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाचे आत्मसमर्पण
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने लुक-आऊट नोटीसनंतर पोलिसात आत्मसमर्पण केले. पीडितेने अत्याचाराचा आरोप केला, तर मुलाने खंडणीचा दावा केला. मंत्र्यांनी कायद्यावर विश्वास व्यक्त केला. तेलंगणा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. के. कविता यांनी मंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
क्रिकेट: षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर फिन ॲलन याने उत्तुंग षटकारांची अक्षरश: आतषबाजी केली. ३५ चेंडूत ९३ धावांची धमाकेदार खेळी करताना त्याने ४ चौकार आणि १० षटकार खेचले. या खेळीत त्याने IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही तो पराक्रम करून दाखवला. एका हंगामात दोन डावात प्रत्येकी १०-१० षटकार मारण्याचा महारेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. IPL मध्ये अशी कामगिरी करणारा क्रिकेट जगातील तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
व्यापार: सोन्यानंतर चांदीबाबत सरकारचा मोठा निर्णय; 'या' नियमात केला बदल, आता, कोणालाही...
Silver Bar News: देशातील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेसाठी आणि सराफा व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या व्यापारावरही एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. देशातील चांदीची आयात मर्यादित करण्यासाठी सरकारने तात्काळ प्रभावाने नवे निर्बंध लागू केले आहेत.
राष्ट्रीय: धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा: राहुल गांधींचे नीट पेपर फुटीवरून गंभीर आरोप
नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच, या घोटाळ्याचे संबंध आरएसएस आणि भाजपशी जोडले. शिक्षणव्यवस्थेत भ्रष्टाचार असून, गुणवत्तेऐवजी विचारधारेला महत्त्व दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बीड: गैरसमज पसरवले: मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
परळीत मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पक्षपाती राजकारणाचे आरोप फेटाळले. मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
लातुर: नीट पेपरफुटी: लातूरमध्ये सीबीआयची कोचिंग क्लास चालकाची चौकशी
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरमधील एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केली. परीक्षेत आलेले प्रश्न आणि लीक झालेल्या पीडीएफमधील प्रश्न सारखेच असल्याचा आरोप आहे. अधिकारी प्रश्नसंच परीक्षेपूर्वी कसा प्रसारित झाला याचा तपास करत आहेत.
क्रिकेट: IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Mohsin Naqvi Possible India Visit During IPL 2026 Final : आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी क्रिकेट विश्वात एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार का? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध आधीच तणावपूर्ण असताना अहमदाबादमध्ये होणाऱ्या ICC च्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चर्चेत आला आहे.
नांदेड: NEET पेपरफुटी: नांदेड, वाशिमचे पालक CBI रडारवर; अनेक व्यवहार उघड.
लातूरनंतर नांदेड-वाशिममध्ये NEET पेपरफुटी प्रकरणी CBI चा तपास सुरु. श्रीमंत पालक नफ्यासाठी पेपर पुन्हा विकण्यात सहभागी, फसवणुकीची साखळी उघड. तपासा टाळण्यासाठी काही पालक फरार झाले आहेत.
व्यापार: सरकारी गॅरंटीसह दरमहा मिळेल ₹९,२५० चे व्याज; किती गुंतवणूक करावी लागेल? जाणून घ्या...
गुंतवणूकीतून बंपर कमाई करण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून मोठी कमाई होऊ शकते, पण त्यात तितकाच तोटा होण्याचाही धोका असतो. परंतु, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
व्यापार: टाटा समूहातील या अधिकाऱ्याला मिळाले ₹२८ कोटींचे पॅकेज, बेसिक सॅलरी होती फक्त ₹१.६७ कोटी
टाटा समूहाची आयटी कंपनी TCS चे सीईओ आणि एमडी के. कृतीवासन यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज समोर आले आहे. कंपनीने जारी केलेल्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, वित्त वर्ष २०२५-२६ मध्ये कृतीवासन यांना तब्बल २८ कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळाले. त्यांचे हे पॅकेज गेल्या वर्षाच्या तुलनेत ६.३ टक्क्यांनी जास्त आहे.
हिंगोली: "माझा हप्ता आला नाही म्हणून पकडता का?" वाळू माफियाचा सवाल
सेंगावात वाळू माफियांनी डेप्युटी कलेक्टरला हप्त्याची कबुली दिली, गाडी जप्त. पोलिसांची नरमाई, जनतेत संताप. दोघे अटकेत.
व्यापार: अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
भारतात पेट्रोल आणि डिझेल सध्या जीएसटीच्या (GST) कक्षेबाहेर आहेत. यामुळे प्रत्येक राज्य सरकार आपल्या गरजेनुसार इंधनावर 'व्हॅट' (VAT - व्हॅल्यू अॅडेड टॅक्स) आणि इतर सेस (Cess) आकारते. परिणामी, देशभरातील विविध राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीत मोठी तफावत पाहायला मिळते. कुठे टॅक्स खूप कमी आहे, तर कुठे तो गगनचुंबी आहे; ज्याचा थेट फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे.
बीड: बीड: हिंगणी तलावात होडी उलटून दोन मुलींचा मृत्यू.
बीडमध्ये दुर्घटना: हिंगणी तलावात मासेमारीची होडी उलटल्याने दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. होडीत तीन मुली होत्या; एक बचावली. मृतांची नावे पलक पारवे (वय १४) आणि दिव्या कांबळे आहेत. गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, पण खूप उशीर झाला होता.
व्यापार: ₹२००० च्या गुंतवणुकीवर रिटायरमेंटला १.०८ कोटी; फिक्स व्याजाची योजना
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक अशी सरकारी योजना आहे, जिथे परताव्याची पूर्ण हमी मिळते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय असून याद्वारे मोठा निधी उभारता येतो. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. विशेष म्हणजे, जुन्या कर रचनेनुसार या योजनेतील गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही.
व्यापार: ओला इलेक्ट्रिकची मोठी घोषणा: २ हजार कोटींची गुंतवणूक करणार
इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ओला इलेक्ट्रिक'नं (Ola Electric) आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. शुक्रवारी कंपनीच्या बोर्डानं आपल्या दोन उपकंपन्यांमध्ये २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनं आणि बॅटरी सेलच्या उत्पादनाला गती देणं तसंच बाजारातील आपलं स्थान अधिक मजबूत करणं, हा या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे.
व्यापार: TVS चा धमाका: ५९ लाख युनिट्स विक्री, तब्बल ₹47,270 कोटींचा महसूल!
TVS Motor ने FY2026 मध्ये ₹47,270 कोटी महसूल कमावून रेकॉर्ड मोडले, 30% वाढ! 59 लाख गाड्यांची विक्री, ज्यात 2.19 लाख तीन चाकी (63% वाढ). दुचाकींची विक्री 24% नी वाढून 27.13 लाख, तर स्कूटरची 27% नी वाढून 24.13 लाख झाली. रेडर 125 ची जोरदार विक्री.
व्यापार: घर खरेदी करताना कर्जाचा बोजा टाळण्यासाठी 'हे' नियम पाळा!
घर खरेदी करणं हा आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आर्थिक निर्णय असतो. परंतु, आपल्या बजेटनुसार किती किमतीचं घर घेणं योग्य आहे, याचं अचूक उत्तर अनेकांना माहीत नसतं. बँक तुम्हाला सहज कर्ज देऊ शकते, पण इन्व्हेस्टमेंट बँकरच्या मते हा मार्ग चुकीचा आहे. खरा प्रश्न हा आहे की, तुम्ही कोणत्याही मानसिक आणि आर्थिक तणावाशिवाय या घराचा खर्च पेलू शकता का?
व्यापार: IT सेक्टर संकटात? गेल्या १४ दिवसांत २५,००० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या, नेमकं कारण काय?
जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांच्या छाटणीचे (Layoffs) सत्र सुरूच आहे. चालू वर्ष, म्हणजेच २०२६ मध्ये आतापर्यंत हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. ताज्या माध्यम अहवालानुसार, एकट्या मे २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांतच जवळपास २५,००० टेक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुंबई: हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले
वादग्रस्त सहायक पालिका आयुक्त महेश पाटील तसेच त्याच्या साथीदारांच्या मालमत्ता गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाटीलने अभिनेता जावेद जाफरी यांची पत्नी हबिबा यांना आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवून कार्यालयात बोलावले. पुढे, अधिकारी पदाचा विश्वास निर्माण करत जाळ्यात ओढले.