Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > IT सेक्टर संकटात? गेल्या १४ दिवसांत २५,००० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या, नेमकं कारण काय?

IT सेक्टर संकटात? गेल्या १४ दिवसांत २५,००० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या, नेमकं कारण काय?

Tech Layoffs 2026: २०२६ मध्ये आतापर्यंत हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:19 IST2026-05-16T14:19:13+5:302026-05-16T14:19:13+5:30

Tech Layoffs 2026: २०२६ मध्ये आतापर्यंत हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

Tech Layoffs 2026: IT sector in crisis? 25,000 employees lost their jobs in the last 14 days, what is the real reason? | IT सेक्टर संकटात? गेल्या १४ दिवसांत २५,००० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या, नेमकं कारण काय?

IT सेक्टर संकटात? गेल्या १४ दिवसांत २५,००० कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या, नेमकं कारण काय?

Tech Layoffs 2026: जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांच्या छाटणीचे (Layoffs) सत्र सुरूच आहे. चालू वर्ष, म्हणजेच २०२६ मध्ये आतापर्यंत हजारो आयटी कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. ताज्या माध्यम अहवालानुसार, एकट्या मे २०२६ च्या पहिल्या दोन आठवड्यांतच जवळपास २५,००० टेक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

या मोठ्या छाटणीमागील सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाचे कारण म्हणजे, कंपन्या आता मानवी बळापेक्षा AI आणि ऑटोमेशनवर अधिक भर देत आहेत. परिणामी, कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी केली जात आहे.

'या' बड्या कंपन्यांनी दाखवला कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

अहवालानुसार, पेपल (PayPal), सिस्को (Cisco) आणि क्लाउडफ्लेअर (Cloudflare) सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

PayPal: पेपल सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. कंपनी पुढील काही वर्षांत त्यांच्या एकूण वर्कफोर्समधील तब्बल २० टक्के कपात करण्याच्या तयारीत आहे. यामुळे सुमारे ४,७०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. कंपनी आता हा निधी एआय आणि ऑटोमेशनमध्ये गुंतवणार आहे.

Cisco: सिस्को कंपनीनेही सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. एआय आणि वेगाने वाढणाऱ्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

इतर कंपन्या: छाटणीचा हा फटका फक्त अमेरिकन कंपन्यांपुरता मर्यादित नसून लिंक्डइन (LinkedIn), फ्रेशवर्क्स (Freshworks), कॉइनबेस (Coinbase) आणि ट्रूकॉलर (Truecaller) या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. फ्रेशवर्क्सने नुकतीच ५०० कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे.

मंदी नाही तर AI जबाबदार..!

पूर्वी कंपन्या खर्च कमी करण्यासाठी किंवा व्यवसायात तोटा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून काढायच्या. मात्र, २०२६ मधील चित्र पूर्णपणे वेगळे आहे. आता कंपन्या फायद्यात असतानाही 'एआय'मुळे नोकरकपात करत आहेत. एआयच्या मदतीने अनेक कामे अधिक वेगाने, अचूक आणि कमी खर्चात होत आहेत. त्यामुळे कंपन्यांना आता 'मोठ्या टीम'ऐवजी 'लहान आणि कार्यक्षम टीम'सोबत काम करणे अधिक फायदेशीर वाटत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या सततच्या छाटणीमुळे टेक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडिया आणि 'रेडिट' सारख्या प्लॅटफॉर्मवर तरुण आयटी व्यावसायिक आपल्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

काही तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, AI पूर्णपणे मानवाची जागा घेऊ शकत नाही. परंतु, बदलत्या काळात फक्त तेच कर्मचारी सुरक्षित राहतील जे स्वतःला अपडेट ठेवतील.

आयटी प्रोफेशनल्सनी आता काय करावे?

अपस्किलिंग : नवीन तंत्रज्ञान आणि स्किल्स शिकणे आता अनिवार्य झाले आहे.

AI सोबत काम करण्याची तयारी: कर्मचाऱ्यांना एआय टूल्सचा वापर करून आपली उत्पादकता कशी वाढवायची, हे शिकावे लागेल.

लवचिकता: येत्या काळात कंपन्यांमधील रिस्ट्रक्चरिंग (बदल) आणखी वाढणार असल्याने कर्मचाऱ्यांनी मानसिकदृष्ट्या तयार राहणे गरजेचे आहे.

Web Title : आईटी सेक्टर संकट में: 14 दिनों में 25,000 नौकरियां गईं!

Web Summary : 2026 में टेक कंपनियों में छंटनी बढ़ी; अकेले मई में 25,000 नौकरियां खत्म हुईं। कंपनियाँ एआई और ऑटोमेशन को प्राथमिकता दे रही हैं, जिससे पेपाल, सिस्को जैसी कंपनियाँ प्रभावित हैं। विशेषज्ञों ने आईटी पेशेवरों को कौशल बढ़ाने की सलाह दी है।

Web Title : IT Sector Crisis: 25,000 Lost Jobs in 14 Days!

Web Summary : Tech layoffs surge in 2026, with 25,000 jobs lost in May alone. Companies prioritize AI and automation, impacting PayPal, Cisco, and others. Experts advise upskilling for IT professionals amid rising uncertainty.