लैंगिक जीवन : ...तर होऊ शकतात हे नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:46 PM2018-11-08T15:46:41+5:302018-11-08T16:11:16+5:30

अनेकदा पती-पत्नी काही काळाने शारीरिक संबंध ठेवणे बंद करतात किंवा फार कमी करतात.

Things that happen to your body when you quit having sex | लैंगिक जीवन : ...तर होऊ शकतात हे नुकसान!

लैंगिक जीवन : ...तर होऊ शकतात हे नुकसान!

Next

अनेकदा पती-पत्नी काही काळाने शारीरिक संबंध ठेवणे बंद करतात किंवा फार कमी करतात. पण वैवाहिक जीवनात नियमीत शारीरिक संबंध ठेवणे केवळ आनंद मिळवण्याचा मार्ग नाही तर यामुळे आरोग्य चांगलं राहण्यासही मदत होते. त्यामुळे तज्ज्ञ लग्न झालेल्या जोडप्यांना नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात ते काय हे जाणून घेऊ....

रोगप्रतिकार शक्ती

अनेक बाबतीत हे सिद्ध झालं आहे की, लग्न झालेल्या जोडप्यांनी नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवले तर त्यांच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याने इन्फेक्शन आणि इतरही आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. पण असे न केल्यास तुम्हाला सतत आजारांचा सामना करावा लागू शकतो.

हृदयरोगाचा धोका वाढतो

जर तुम्ही नियमीतपणे वर्कआउट करत नसालही आणि शारीरिक संबंध नियमीत ठेवत असाल तर तुमचं शरीर योग्य आकारात आणि निरोगी राहतं. असे न केल्यास तुमच्या मांशपेशी आणि हार्मोन्सवर वाईट प्रभाव पडतो.

तणाव वाढण्याचा धोका

वेगवेगळ्या कारणांनी येणारा तणाव हा तुमच्यासाठी फार वाईट असतो. हा तणाव दूर करण्यातही शारीरिक संबंध महत्त्वाची भूमिका बजावतात. जास्त तणावामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयासंबंधी समस्या निर्माण होते.

कामेच्छेवर वाईट प्रभाव

काही तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, लग्न झाल्यानंतर नियमीतपणे शारीरिक संबंध न ठेवल्याने कामेच्छेवर वाईट प्रभाव पडतो. याने लैंगिक जीवनातील रस कमी होतो. 

जवळीकता संपते

जर पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव शारीरिक संबंध ठेवणे बंद झाले तर याचा परिणाम त्यांच्या नात्यावर पडतो. शारीरिक संबंध नियमीत ठेवले तर दोघेही भावनिकपणे जवळ येतात आणि नातं आणखी चांगलं होण्यास मदत होेते.

 

Web Title: Things that happen to your body when you quit having sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.