लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 15:45 IST2019-03-30T15:43:10+5:302019-03-30T15:45:31+5:30

शारीरिक संबंधावेळी तुम्ही उत्तेजित झाल्यामुळे तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. यातील काही बदलांबाबत सर्वांनाच माहीत आहे.

Sexual life: Women body may changes like that during sex | लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात 'हे' बदल

लैंगिक जीवन : उत्तेजित झाल्यावर महिलांच्या शरीरात होतात 'हे' बदल

(Image Credit : Wellbeing Magazine)

शारीरिक संबंधावेळी तुम्ही उत्तेजित झाल्यामुळे तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. यातील काही बदलांबाबत सर्वांनाच माहीत आहे. पण काही असेही बदल असतात जे फार विचित्र प्रकारचे असतात. यातील काही तुमच्या लक्षात येत नसतील किंवा तुम्हाला कळतही नसतील. आम्ही अशाच ५ विचित्र बदलांबाबत सांगणार आहोत. 

असं वाटतं टॉयलेटला जावं

शारीरिक संबंधासाठी उत्साहित झाल्यावर अनेकांना असं वाटत असतं की, एकदा टॉयलेटला जाऊ आलो तर बरं होईल. असं होण्याचं कारण म्हणजे शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होणारा भाग टॉयलेटशी संबंधित अवयवाच्या आजूबाजूलाच असतं. असं तेव्हाही होतं जेवहा तुमचा जी-स्पॉट स्टिम्युलेटेड होतो.

डोळ्यात नशा

महिला जेव्हा उत्तेजित होतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात हे स्पष्टपणे बघितलं जाऊ शकतं. त्यांच्या डोळ्यात एक अजब नशा येऊ लागतो. त्यांच्या डोळ्यातील बुबुळं वरच्या दिशेने झालेली बघायला मिळतात किंवा महिला सामान्यपणे डोळे बंद करतात. 

डोकेदुखीही होते

काही महिलांना उत्तेजित झाल्यावर डोकेदुखीही होऊ लागते. हे दुखणं मानेपासून सुरू होऊन डोक्याच्या मागच्या भागापर्यंत पोहोचतं. ऑर्गॅज्मच्याआधी आणि नंतर डोकेदु:खी अनेकदा जोरात होते. मायग्रेनने हैराण असलेल्या महिलांसोबत ही समस्या अधिक बघायला मिळते. 

पापण्या अधिक वेगाने हलणे

अनेकदा शारीरिक संबंधासाठी उत्तेजित झाल्यावर काही महिलांच्या डोळ्यांच्या पापण्या जास्त खाली-वर होतात. ज्या महिला पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतात त्यांच्यासोबत हा प्रकार अधिक होतो. 

आधीसारखं काही न वाटणे

शारीरिक संबंधाबाबत जे लोकांनी ऐकलेलं असतं तसंच होण्याचीही अनेक लोक वाट बघत असतात. पण हे गरजेचं नाहीये की, प्रत्येकवेळी तसंच व्हावं. या गोष्टीमुळे अनेकजण इरिटेड होतात. 

जेनिटल्समध्ये होऊ लागतो बदल

भलेही तुम्ही हे तुमच्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत, पण एक्साइटमेंटमध्ये तुमच्या जेनिटल्स म्हणजेच गुप्तांगात बदल होतो. त्यात रक्त अधिक भरलं जात असल्याने त्याचा आकार वाढू लागतो. त्याचा रंग गुलाबीचा लाल होऊ लागतो. काहीबाबतीत तर हा रंग जांभळाही होतो. 
 

Web Title: Sexual life: Women body may changes like that during sex