लैंगिक जीवन : 'बारीक पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ पुरूष 'कार्यक्रम' करण्यात जास्त आघाडीवर!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 16:33 IST2020-01-24T16:31:07+5:302020-01-24T16:33:31+5:30
लठ्ठपणामुळे तुमची पर्सनॅलिटी आणि लूक सगळंच बिघडून जातं. इतकेच नाही तर तुमच्या पर्सनॅलिटीवर एकप्रकारे नकारात्मक प्रभाव पडतो. पण याबाबतीत लठ्ठ लोकांचं लैंगिक जीवन अपवाद आहे.

लैंगिक जीवन : 'बारीक पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ पुरूष 'कार्यक्रम' करण्यात जास्त आघाडीवर!'
जर कुणाचं जास्त वजन असेल, जर कुणी लठ्ठपणाचे शिकार असतील तर त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे सर्वांनाच माहीत आहे. लठ्ठपणामुळे तुमची पर्सनॅलिटी आणि लूक सगळंच बिघडून जातं. इतकेच नाही तर तुमच्या पर्सनॅलिटीवर एकप्रकारे नकारात्मक प्रभाव पडतो. पण याबाबतीत लठ्ठ लोकांचं लैंगिक जीवन अपवाद आहे. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जे लोक लठ्ठ आहेत आणि ज्यांचा बीएमआय जास्त आहे ते लोक सडपातळ आणि वजन कमी असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात.
आश्चर्यकारक निष्कर्ष
यूकेतील एन्गलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आणि अभ्यासकांनी ब्रिटनमधील साधारण ५ हजार सेक्शुअली अॅक्टिव पुरूषांचं विश्लेषण केलं. या अभ्यासातून ते या निष्कर्षावर पोहोचले की, लठ्ठ पुरूष सडपातळ किंवा कमी वजन असलेल्या पुरूषांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. हा रिसर्च PLOS नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.
(Image Credit : Economicstimes.com)
या रिसर्चमधील अभ्यासकांची सर्वात हैराण करणारी बाब ही होती की, लठ्ठपणाने ग्रस्त पुरूष ज्यांच्या शरीरात मांस अधिक होतं, त्यांच्यात सडपातळ लोकांच्या तुलनेत आपल्या शरीराबाबत कमी समस्या बघायला मिळाल्या. याच कारणाने त्यांना जास्त शारीरिक संबंध ठेवण्याचा कॉन्फिडन्स मिळतो, असंही त्यात सांगण्यात आलंय.
महिलांबाबतही हेच लागू पडतं?
रिसर्चनुसार, केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्येही असंच बघायला मिळतं. अभ्यासकांना असं आढळून आलं की, ओव्हरवेट महिलांनी सुद्धा कमी वजन असलेल्या महिल्यांच्या तुलनेत १६ टक्के जास्त शारीरिक संबंध ठेवला. या रिसर्चमधून पहिल्यांदाच व्यक्तीचं वजन आणि त्यांच्या इटंरकोर्सची फ्रिक्वेन्सी यातील संबंध समोर आला. सोबतच या रिसर्चमधून असाही दावा करण्यात आला आहे की, ओव्हरवेट आणि लठ्ठ लोक आपल्या नात्यात जास्त आनंदी आणि संतुष्ट राहतात.
दुसरा एक रिसर्च हे खोडून काढतो
लठ्ठपणा आणि वजन जास्त असल्याने दररोज वजन कमी करण्यात गुंतलेले लोकांसाठी हा रिसर्च थोडा दिलासा देणारा असेलही. पण अशा लोकांना हेही माहीत असलं पाहिजे की, आतापर्यंतच्या जास्तीत जास्त रिसर्चमध्ये हेच सांगण्यात आलं आहे की, जास्त बीएमआय आणि ओव्हरवेट लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्शुअल समस्यांचा सामना करावा लागतो. एका दुसऱ्या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, लठ्ठपणाने ग्रस्त ३० टक्के लोकांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होते. त्यांच्यात शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते आणि त्यांचा परफॉर्मन्सही घसरतो. तसेच त्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्याही होते. त्यामुळे आता समोर आलेल्या रिसर्चवर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो.
हेल्दी बॉडी हेल्दी लैंगिक जीवन
सगळ्यांनीच हा प्रयत्न केला पाहिजे की, वजन आणि बीएमआय दोन्ही नियंत्रित असावं. केवळ दुसरे करतात म्हणून तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. कारण एक हेल्दी शरीर आणि हेल्दी माइंडच्या माध्यमातून तुमचं लैंगिक जीवनही हेल्दी राहू शकतं.