Sex Life: What is best time to intimate according to Ayurveda | लैंगिक जीवन : आयुर्वेदानुसार कोणता आहे बेस्ट टाईम?
लैंगिक जीवन : आयुर्वेदानुसार कोणता आहे बेस्ट टाईम?

शारीरिक संबंध कधी ठेवावे याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही वेगवेगळ्या वेळा सांगण्यात आल्या आहेत. पण तज्ज्ञ सांगतात की, दोघांची ईच्छा जेव्हा होईल तेव्हा त्यांनी संबंध ठेवल्यास त्यांना हवा तो आनंद मिळेल. पण याबाबत आयुर्वेदात काहीतरी वेगळं सांगितलं आहे. आयुर्वेदात शारीरिक संबंधाला आनंदाशिवाय शरीराला पोषण देणारं एक माध्यमही मानलं जातं. 

पार्टनरसोबतचं नातं मजबूत करण्यासाठी लैंगिक जीवन आनंदी असणं गरजेचं आहे. शारीरिक संबंध हा केवळ पिढी वाढवण्याचा मार्ग नाही. तर दोन लोकांमध्ये त्यांच्या नात्यामध्ये व्यवस्थित ताळमेळ चांगला राहतो. आयुर्वेदात सांगण्यात आले आहे की, शारीरिक संबंधाचं दुसरं काम आपल्याला खोलवर पोषित करणं हे आहे'.

द हेल्थ साइटने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सकाळी ६ वाजेपासून ते ८ वाजेपर्यंत पुरूष सर्वात जास्त उत्तेजित असतात. पण यादरम्यान काही महिला झोपेत असतात आणि त्यांच्या शरीराचं तापमान कमी असतं. त्यामुळे यावेळी शारीरिक संबंध पुरूषांसाठी चांगलं असलं तरी महिला यावेळी संबंध जास्त एन्जॉय करू शकत नाहीत.

असं मानलं जातं की, दुपारच्यावेळी महिला अधिक उत्तेजित असतात. पण यावेळी पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण सामान्य असतं. त्यामुळे ते शारीरिक संबंधाऐवजी चांगलं काहीतरी खाण्याच्या शोधात असू शकतात.

आयुर्वेदानुसार, दुपारी २ वाजतापासून ते ४ वाजेपर्यंत महिलांचं रिप्रॉडक्टिव्ह सिस्टम फार सक्रिय असतं. त्यामुळे ही वेळ चांगली मानली जाते. असं असलं तरी आजच्या धावपळीच्या जीवनात यावेळेत संबंध ठेवणं अवघडच नाही तर अशक्य आहे. त्यामुळे सध्या लोक रात्रीच्या जेवणानंतर ८ ते १० ही वेळ योग्य मानतात.

कधी ठेवू नये संबंध

आयुर्वेदानुसार अनोशापोटी किंवा खूप जास्त खाल्ल्यावर शारीरिक संबंध ठेवू नये कारण याने वाताचा बॅलन्स बिघडतो. याने पचनकक्रियेशी संबंधित समस्या, डोकेदुखी आणि गॅस्ट्रिकची समस्या होऊ शकते. 

आयुर्वेदात किंवा वेगवेगळ्या रिसर्चमध्ये अनेक गोष्टी किंवा शारीरिक संबंधाच्या वेळा सांगितल्या आहेत. पण मुळात दोघांचा मूड केव्हा होतो याला महत्व दिलं पाहिजे. रिसर्चमध्ये सांगितलेल्या वेळेत जर दोघांचाही कशाचा मूड नसेल तर त्यांना संबंधातून आनंदही मिळणार नाही. त्यामुळे दोघांचा मूड, इच्छा आणि परिस्थिती बघून लोकांनी काय ते करावं. 


Web Title: Sex Life: What is best time to intimate according to Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.