लैंगिक जीवन : लॉंग इनिंग खेळायची असेल तर काय करावं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 03:43 PM2019-11-14T15:43:50+5:302019-11-14T15:50:23+5:30

कोणतंही काम करण्यासाठी स्ट्रेथ, फोकस आणि काही खास तयारीची गरज असते. पण अलिकडच्या धावपळीच्या जीवनात पार्टनरसोबत पुरेसा वेळ घालवता येणं किंवा रोमान्ससाठी शक्ती असणं जरा अवघड होताना दिसतं.

Sex Life: These tips will help you for long Inning | लैंगिक जीवन : लॉंग इनिंग खेळायची असेल तर काय करावं? 

लैंगिक जीवन : लॉंग इनिंग खेळायची असेल तर काय करावं? 

googlenewsNext

कोणतंही काम करण्यासाठी स्ट्रेथ, फोकस आणि काही खास तयारीची गरज असते. पण अलिकडच्या धावपळीच्या जीवनात पार्टनरसोबत पुरेसा वेळ घालवता येणं किंवा रोमान्ससाठी शक्ती असणं जरा अवघड होताना दिसतं. अशात वेळ मिळालाच तर या चान्सचा परिपूर्ण आनंद मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर लॉंग इनिंग खेळायची असेल तर काही गोष्टी बदलाव्या लागतील. त्या काय हे जाणून घ्या.... 

पोजिशन आणि जागा बदला

सामान्यपणे सगळेच बेडरूममध्ये बेडवरच शारीरिक संबंध ठेवतात. पण त्याच त्याच पोजिशन किंवा नेहमी एकसारख्याच गोष्टी करून अर्थात तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे शक्य असेल तर घरातील इतर ठिकाणी शारीरिक संबंध ठेवा. वेगवेगळ्या पोजिशन ट्राय करायला अजिबात हरकत नाही. फक्त त्यात दोघांचीही सहमती असावी. याने तुमच्या लैंगिक जीवनात एक नवा जोश, नवा उत्साह भरला जाईल. 

फोरप्लेला द्या जास्त वेळ

अर्थातच शारीरिक संबंधावेळी मोठी खेळी खेळायची असेल तर तुमचा स्टॅमिना कमी पडेल आणि थकवा जाणवेल. अशात तुम्ही शारीरिक संबंध ठेवताना तुम्ही मधे मधे ब्रेक घेऊ शकता. दरम्यान किसींग, मिठी मारणे या गोष्टी करू शकता. म्हणजे काय तर तुम्ही फोरप्लेला जास्त वेळ दिला पाहिजे. याने दोघांचीही उत्तेजना वाढेल, संबंधाचा वेळ वाढेल आणि ऑर्गॅज्म मिळण्याची शक्यताही वाढेल.

कीगल एक्सरसाइज करा

(Image Credit : sharp.com)

शारीरिक संबंधाची मोठी खेळी खेळायची असेल तर स्टॅमिनाची जास्त गरज असते. त्यासाठी शारीरिक संबंधात मदत होईल अशा एक्सरसाइजवर लक्ष द्या. कीगल एक्सरसाइजने पेल्विक एरियातील(ओटीपोटाजवळील) मसल्स स्ट्रॉंग होतात. याने दोघांनाही वेगवेगळ्या दृष्टीने फायदा होता. तसेच ऑर्गॅज्म मिळण्यासही मदत मिळते.

स्वत:ला हायड्रेट ठेवा

(Image Credit : ntc.lluh.org)

शारीरिक संबंधाची मोठी खेळी खेळताना शरीर डिहायड्रेट होऊ न देण्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. यासाठी भरपूर पाणी सेवन करा. तसेच शारीरिक संबंधावेळीही जवळ पाणी ठेवा. पण यावेळी इतकंही जास्त पाणी पिऊ नका की, सगळं काही सोडून १० वेळा लघवीला जावं लागेल. तहान लागल्यावर थोडं थोडं पाणी पित रहावं.

चांगला आहार

स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे चांगला आहार घेणे. पोष्टिक पदार्थांसोबतच वेगवेगळी फळं नियमित खावीत. याने शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि तुमचा स्टॅमिना आपोआप वाढेल. त्यामुळे चांगल्या आहाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.


Web Title: Sex Life: These tips will help you for long Inning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.