टेस्टोस्टेरॉन शरीरातील सर्वात महत्वपूर्ण हार्मोन असतो. मसल्स मास, बोन डेन्सिटी आणि सेक्स ड्राइव्ह तयार कायम ठेवण्यात हे हार्मोन्स महत्वाची भूमिका बजावतात. यामुळेच टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कायम ठेवणं अनिवार्य असतं. टेस्टोस्टेरॉनमध्ये असंतुलन झाल्यास इन्फर्टिलिटी, नपुंसकता आणि कमजोरी येते.

त्यासोबत टेस्टोस्टेरॉन सेक्स ड्राइव्हशी जुळलेला आणि शुक्राणुच्या उत्पादनातही महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा शरीर टेस्टोस्टेरॉनची योग्य प्रमाणात निर्मिती करत नाही तेव्हा त्या स्थितीला हायपोगोनॅडिज्म असं म्हणतात. टेस्टोस्टेरॉनबाबत आणखीही काही तथ्य आहेत जे तुम्हाला याचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतील.

Itching in penis reasons and treatments | <a href='https://www.lokmat.com/topics/sex-life/'>लैंगिक जीवन</a> : पुरूषांना प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग होण्याची कारणे!

आनंदाशी संबंध - असे मानले जाते की, जेव्हा पुरूषांकडे अधिक पैसा येतो किंवा एखाद्या विजयाचा त्यांना आनंद होतो त्यावेळी टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शरीरात वाढतं. त्यासोबतच पॉर्न बघताना देखील पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं.

भाज्या ठरतात फायदेशीर - हे एक प्रसिद्ध तथ्य आहे की, आहाराचा आपल्या आरोग्यावर फार प्रभाव पडतो. मजेदार बाब ही आहे की, जे लोक शाहाकारी असतात त्यांच्यात मांस खाणाऱ्या पुरूषांच्या तुलनेत अधिक टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण असतं.

मूड स्विंग्स - टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झालं तर याने मूड स्विंग्सची समस्या होते. बोन डेन्सिटी आणि मसल्स मासही कमी होतं. त्यासोबतच शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी झाल्यास सेक्स ड्राइव्हही कमी गोते आणि अकाली वृध्दत्वाची लक्षणेही वाढू लागतात.

वयाचा प्रभाव नाही - हे गरजेचं नाही की, वृद्ध पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असेल. पण तथ्य हे आहे की, कोणत्याही वयात पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होऊ शकतं. कमी टेस्टोस्टेरॉनचं कारण स्लिप एप्निया, डायबिटीस हे असू शकतात.

सिंगल असाल तरिही - लोक असं मानतात की, लोक जेव्हा प्रेमात असतात किंवा रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं आणि महिलांना सुद्धा त्यांच्या जोडीदाराबाबत असंच वाटतं. ज्या महिला प्रेमात असतात त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असतं आणि त्या सेक्शुअली अ‍ॅक्टिवही असतात.


Web Title: Sex life : Information regarding sex hormone testosterone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.