लैंगिक जीवन : वयाच्या 'या' टप्प्यावर परमोच्च आनंद कायम कसा ठेवाल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 04:11 PM2019-09-04T16:11:28+5:302019-09-04T16:18:41+5:30

एका वयानंतर लैंगिक जीवनावर अधिक लक्ष देण्याची गरज पडते. कारण या वयात तुम्ही आधीपेक्षा अधिक बिझी होता. याचा वाईट प्रभाव तुमच्या लैंगिक जीवनावर पडतो.

Sex Life: Follow these tips for happy married life on 40 plus | लैंगिक जीवन : वयाच्या 'या' टप्प्यावर परमोच्च आनंद कायम कसा ठेवाल? 

लैंगिक जीवन : वयाच्या 'या' टप्प्यावर परमोच्च आनंद कायम कसा ठेवाल? 

googlenewsNext

(Image Credit : performanceinsiders.com)

४० वयानंतर लैंगिक जीवनावर अधिक लक्ष देण्याची गरज पडते. कारण या वयात तुम्ही आधीपेक्षा अधिक बिझी होता. याचा वाईट प्रभाव तुमच्या लैंगिक जीवनावर पडतो. महिला ४० वयात शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करणं सुरू करतात, आणि दुसरीकडे पुरूषांना यात कंटाळा येऊ लागतो. जर तुम्हालाही तुमच्या लैंगिक जीवनात असाच काही अनुभव येत असेल तर काही टिप्स तुम्ही फॉलो करू शकता.

शेड्यूल तयार करा

जर तुम्ही दोघेही फार बिझी राहत असाल आणि लैंगिक जीवन पुन्हा व्यवस्थित रूळावर आणायचं असेल तर यासाठी शेड्यूलची मदत घेऊ शकता. दोघांनीही याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि ते फॉलो करा. हे जरा हास्यास्पद नक्कीच वाटू शकतं. पण याने तुमच्या लैंगिक जीवनात एक वेगळाच बदल बघायला मिळेल. 

गॅजेट्सना करा बाय-बाय

(Image Credit : msn.com)

बेडरूममध्ये गॅजेट्सना नो एन्ट्री असली पाहिजे. स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉपसारख्या स्क्रीन असलेल्या गॅजेट्सपासून अंतर ठेवा. जेणेकरून पार्टनर जवळ येऊ शकेल. कारण या गोष्टींमुळे तुमचा किंवा पार्टनरचा मूड ऑफ होऊ शकतो. या वस्तू रूममध्ये नसतील तर ना स्टेटस चेक करायला मिळेल ना ई-मेल्स बघायला मिळेल. पूर्ण लक्ष शारीरिक संबंधाकडे देता येईल.

प्रयोग करायला घाबरू नका

(Image Credit : nutzaboutme.com)

वैवाहिक जीवनात एका काळानंतर सगळ्याच गोष्टी रूटीन होतात. या रुटीनमुळे आलेली निराशा किंवा कंटाळा बेडरूमपर्यंत येऊन पोहोचतो. हा एकसारखेपणा किंवा तोच-तोचपणा तोडायचा असेल तर काही नवीन प्रयोग करा. नवीन सेक्स पोजिशन ट्राय करा. पण हे करत असताना काळजी घ्या. वेगवेगळ्या पोजीशनची माहिती तुम्हाला इंटरनेटवर सहजपणे बघायला मिळेल. तसेच तज्ज्ञांचाही सल्ला घ्यायला विसरू नका.

पुन्हा नव्याने सुरूवात

(Image Credit : independent.ie)

तुम्ही एकमेकांसोबत अनेक वर्षांपासून असाल तर अर्थातच तुम्हाला एकमेकांबाबत सगळं काही माहीत असेल. पण एकमेकांना पुन्हा एक्स्पोर करा. या वयात एकमेकांसाठी अधिक वेळ काढा. फोरप्लेला महत्व द्या. याने शारीरिक संबंधा वेळ तर वाढतोच, सोबतच दोघांनाही ऑर्गॅज्मचा आनंदही मिळवून देतो.

इशाऱ्यांमध्ये साधा संवाद

(Image Credit : aarp.org)

शारीरिक संबंधावेळी सामान्यवेळी महिला त्यांचे डोळे बंद ठेवतात आणि या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण पार्टनरच्या डोळ्यात डोळे घालून पाहिल्यास आनंद अधिक मिळतो. असं करायला तुम्हाला अजब किंवा विचित्र वाटेल, पण हे करून बघा. असं करून तुम्हाला एकमेकांशी अधिक कनेक्ट असल्याचे जाणवेल.

Web Title: Sex Life: Follow these tips for happy married life on 40 plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.