लैंगिक जीवन : आतुरता वाढवण्यासाठी 'या' फोरप्ले टिप्स ट्राय करा, मिळेल हवा तो आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 16:29 IST2020-02-22T16:18:07+5:302020-02-22T16:29:50+5:30
अनेक पुरूष शारीरिक संबंधा आणि फोरप्लेसाठी एकच ठिकाण निवडतात. ते याचा अजिबात विचार करत नाहीत की, त्या ठिकाणावर पार्टनर सहज आहे किंवा नाही.

लैंगिक जीवन : आतुरता वाढवण्यासाठी 'या' फोरप्ले टिप्स ट्राय करा, मिळेल हवा तो आनंद!
(Image Credit : beyondages.com)
अनेकदा असं बघण्यात आलं आहे की, शारीरिक संबंधानंतर पुरूष आपल्या पार्टनरपासून लगेच दूर जातात. त्यांना शारीरिक संबंधानंतर हे जाणून घेण्याची गरज वाटत नाही की, त्यांनी पार्टनरला संतुष्टी मिळवून दिली की नाही. शारीरिक संबंधाच्या आधी महिलांची इच्छा असते की, त्यांच्या पार्टनरने फोरप्लेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवावा. काही पुरूष फोरप्ले करतात, पण त्यांना पूर्ण स्टेप माहीत नसते. तसेच पार्टनरसोबत प्रेमाच्या गुप्पाही करत नाहीत. हे लोक थेट मेन अॅक्ट सुरू करतात. मात्र, जास्तीत जास्त महिलांना मेन अॅक्टआधी फोरप्ले करणं पसंत असतं.
अनेक पुरूष शारीरिक संबंधा आणि फोरप्लेसाठी एकच ठिकाण निवडतात. ते याचा अजिबात विचार करत नाहीत की, त्या ठिकाणावर पार्टनर सहज आहे किंवा नाही. कारण एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने शारीरिक संबंध ठेवणे किंवा फोरप्ले करणे त्यांच्यासाठी बोरिंग होतं.
(Image Credit : femina.in)
कधी-कधी पुरूष फोरप्लेसाठी एक वेळ ठरवून घेतात, पण असं करणं चुकीचं आहे. प्रत्येक महिलेला शारीरिक संबंधासाठी तयार होण्याची किंवा पूर्णपणे उत्तेजित होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे एक ठराविक वेळ ठरवून फोरप्ले करणं चुकीचं ठरेल. काही महिला लगेच तयार होतात तर काही महिलांना वेळ लागतो. अशात आम्ही आज तुम्हाला फोरप्लेसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
घाई करू नका
याची काळजी घ्या की, फोरप्ले करताना आपल्या पार्टनरसोबत अधिक इंटिमेट झाल्याचा उतावळेपणा दाखवू नका. हे काम तुम्ही आरामात-निवांत करा. त्यांना चांगलं वाटू द्या आणि मगच पुढे जा. ते तुम्ही वाचलं असेलच, अति घाई संकटात नेई....
काही नवीन करा
जर तुम्ही आधीपासूनच एकप्रकारचा फोरप्ले करत असाल तर काहीतरी नवीन ट्राय करा. नेहमीच एकाचप्रकारे फोरप्ले केल्याने महिला पार्टनरला कंटाळा येऊ शकतो. महिला कानाजवळ स्पर्श केल्याने अधिक उत्तेजित होता. त्यामुळे तुम्ही पार्टनरच्या कानाला किस करू शकता. याने काम सोपं होईल.
मनातलं बोला
असं अजिबात गरजेचं नाही की, तुम्ही शांत राहून एकही शब्द न बोलता फोरप्ले करावा. यावेळी तुम्ही पार्टनरसोबत रोमॅंटिक गोष्टीही बोलू शकता. यावेळी तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी त्यांना सांगू शकता. याने त्यांना चांगलं तर वाटेलच सोबतच शारीरिक संबंधाचा अधिक आनंद घेता येईल.
हायजीनकडेही द्या लक्ष
इंटिमेट होताना तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या हायजीनचीही काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता चांगली करा आणि डीओ-परफ्यूमचा वापर करा. जेणेकरून दोघांनाही चांगलं वाटेल.
किस करा
सामान्यपणे फोरप्लेची सुरूवात किसिंगने होते. पण अनेकदा एकदम जोरात किस केल्याने फोरप्लेची सगळी मजाच निघून जाते. अशावेळी किसिंगची सुरूवात सॉफ्ट किसने करावी. हा किस असा असावा ज्याने तुमच्या पार्टनरला त्यांच्याविषयीचं प्रेम आणि काळजी जाणवावी.
मालिश करा
मालिश करून तुम्ही तुमचे हे खास क्षण आणखीन खास करू शकता. तुमच्या पार्टनरच्या पायांची, पाठीची, मानेची मालिश करा. याने पार्टनरचा सगळा थकवा तर दूर होईल, सोबतच त्यांचा मूडही चांगला होईल. वातावरण आणखी रोमॅंटिक करण्यासाठी सुगंधीत तेलाचा वापर करावा. या टिप्स दोघेही वापरू शकता.
फक्त बेडरूममध्येच नको
फोरप्लेला केवळ तुमच्या बेडरूमचा भाग बनवू नका. फोरप्लेला तुम्ही दिवसाचा मुख्य भाग बनवू शकता. याने तुमचा दिवस चांगला होईल. पार्टनरसोबत फ्लर्ट करा. त्यांना जवळ घ्या, रोमॅंटिक गप्पा करा. ते सगळं करा ज्याने पार्टनर तुमच्याजवळ येण्यासाठी आतुर होईल. तेव्हा कुठे दोघांनाही हवा तो आनंद शारीरिक संबंधातून मिळेल.