शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सोडवा लैंगिक समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:06 AM

कुठलीही लैंगिक समस्या एकट्या पुरुषाची वा स्त्रीची नसते. वयाच्या ४०व्या वर्षानंतर ५० टक्के पुरुषांमध्ये लैंगिक समस्या दिसून येतात. आपल्या पत्नीला लैंगिक जीवनात संतुष्ट न करू शकल्यामुळे, प्रत्येकी पाच पुरुषांमधील एकाचा घटस्फोट तर, १० पुरुषांमधील एका पुरुषाचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकदा नपुंसकपणा हा रोग आहे, असे समजून विचित्र पद्धतीने उपचार केले जातात. यामुळे समस्येत आणखीच भर पडते. वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्यांविषयी वेळीच समजून घेणे गरजेचे आहे, याविषयी जाणून घेऊ या...

- डॉ. मिन्नू भोसलेकुठलीही लैंगिक समस्या एकट्या पुरुषाची वा स्त्रीची नसते. वयाच्या ४०व्या वर्षानंतर ५० टक्के पुरुषांमध्ये लैंगिक समस्या दिसून येतात. आपल्या पत्नीला लैंगिक जीवनात संतुष्ट न करू शकल्यामुळे, प्रत्येकी पाच पुरुषांमधील एकाचा घटस्फोट तर, १० पुरुषांमधील एका पुरुषाचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकदा नपुंसकपणा हा रोग आहे, असे समजून विचित्र पद्धतीने उपचार केले जातात. यामुळे समस्येत आणखीच भर पडते. वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्यांविषयी वेळीच समजून घेणे गरजेचे आहे, याविषयी जाणून घेऊ या...वैवाहिक जीवनातील लैंगिक समस्यांविषयी सांगा?लैंगिक भावना लहानपणापासून असतात, पण त्यांची प्रकर्षाने जाणीव तरुणपणात होते. लग्नाआधी बहुतांश तरुण-तरुणी लैंगिक संबंधापासून दूर असतात. त्यामुळे या भावना जरी तरुणपणात निर्माण होत असल्या तरी खरे लैंगिक जीवन हे लग्नानंतरच सुरू होते. याचमुळे लैंगिक जीवनातील समस्या जास्त प्रमाणात लग्नाच्या काही दिवस अगोदर किंवा नंतर लक्षात येतात. लग्नानंतर लैंगिक संबंध सुरळीत झाले तर वैवाहिक बंधन घट्ट होणे सोयीचे जाते, पण लग्नानंतर लगेचच काही समस्या आली तर मात्र वैवाहिक बंधन तयारच होत नाही.नेमक्या कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते?या समस्या मुख्यत्वे जननेंद्रियाच्या रचनेविषयी किंवा शरीरक्रियेविषयी शास्त्रोक्त माहिती नसणे, लैंगिक वर्तणुकीबद्दल गैरसमज, विवाहित जोडीदाराबद्दल असणारे संबंध यामुळे असतात. यात राग, थकवा, नैराश्य, पुरुषांमध्ये संबंधाचे दडपण या मानसिक कारणांमुळेही लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. लैंगिक समस्यांच्या शारीरिक किंवा वैद्यकीय कारणांमध्ये संप्रेरकाची कमतरता किंवा जास्त प्रमाण, लैंगिक अवयवांचे आजार व मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारखे प्रदीर्घ रोग किंवा त्यांच्यावरील उपचार ही प्रमुख कारणे आहेत. पुरुषांमध्ये नपुंसकत्व, शीघ्रपतन व लैंगिक इच्छा नसणे, तर स्त्रियांमध्ये लैंगिक संवेदनाच नसणे (फ्रिझीडीटी), वेदनामय समागम व लैंगिक इच्छा नसणे या प्रमुख समस्या असतात. जवळपास ७५-८० टक्के समस्या मानसिक कारणांमुळे होतात.यावर तोडगा कसा काढावा?बऱ्याच जोडप्यांना लैंगिक समस्यांवर उपचार करणाºया योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांबद्दल काहीच माहिती नसते. काही जण पारंपरिक वैद्य किंवा भोंदू डॉक्टरांकडे जातात. पण ही मंडळी त्यांना घाबरवून पैसा कमवतात व समस्या तशीच असते. या समस्या लैंगिक समुपदेशन व उपचाराद्वारे बºया होऊ शकतात. यात मुख्यत्वे दोन्ही जोडीदारांना उपचार पद्धतीत सहभागी करून घेतले जाते. दोघांना लैंगिक जीवनाबद्दल शरीररचना व क्रियेबद्दल तसेच लैंगिक क्रियांची माहिती दिल्याने हळूहळू त्यांचे लैंगिक संबंध सामान्य करता येतात.ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला लैंगिक समस्या असतील त्यांनी काय करावे?त्यांनी लैंगिक समस्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडेच उपचारांकरिता जावे. योग्य डॉक्टर नेहमी औषधोपचार लिहून देतो. स्वत:च औषधोपचार करणे टाळावे. योग्य व प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. व्हायग्रा या गोळ्या प्रत्येक लैंगिक समस्येवर रामबाण उपाय आहे, असे समजू नका. लैंगिक समस्या दीर्घकाळ रेंगाळत ठेवू नका. त्यावर त्वरित उपचार करा. तुमच्या जोडीदाराला लैंगिक समस्या असल्यास त्याला धीर द्या. त्याच्याबरोबर उपचारात सहभागी व्हा. लैंगिक समस्या बºयाच जणांना असतात. तुम्ही एकटेच त्यांनी ग्रस्त आहात, असे समजू नका. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सnewsबातम्या