4 useful wedding night sex tips for newly weds | लैंगिक जीवन : ....जेणेकरून पहिल्याच रात्री काही अजब घडू नये!
लैंगिक जीवन : ....जेणेकरून पहिल्याच रात्री काही अजब घडू नये!

(Image Credit : Social Media)

जास्तीत जास्त लोक हे बॉलिवूडचे सिनेमे बघत-बघत मोठे झालेले असतात. त्यांच्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे लग्नाच्या दिवशीच पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणं असं असतं. पण सिनेमात जे तुम्ही बघता ते पूर्णपणे सत्य नसतं. होऊ शकतं की, मधुचंद्राच्या रात्रीबाबत तुमच्या मनातही अनेक प्लॅन्स असतील. पण दोघांसाठी पहिल्याच रात्री कोणतीही अजब स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पहिल्या रात्री काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या.   

पाण्यात पडल्यासारखे करू नका

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्या रात्री अजिबात कोणत्याही गोष्टीसाठी घाई करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. हे नवं नातं, नवा अनुभव प्रेमाने आणि हळूवारपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करा. घाईत असं काही होऊ शकतं की, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चातापही करावा लागू शकतो. पहिल्या रात्रीच्या खास क्षणांचा आनंद घ्या, कारण असे क्षण पुन्हा येत नसतात. पहिल्याच रात्री शारीरिक संबंध ठेवावं असं काही बंधन नसतं. तुम्ही सहज नसाल तर या गोष्टी हळूवारपणे पुढे नेऊ शकता. तुमच्या दोघातील असहजता दूर होण्यासाठी संवादाने सुरूवात करू शकता.  

उगाच अपेक्षा ठेवू नका

दिवसभराची धावपळ आणि रितीरिवाजांमुळे दोघेही थकलेले असता. त्यामुळे तुम्ही पहिल्या रात्रीच फार काही करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्यात न्यूनगंड येण्याचीही शक्यताही असते. त्यामुळे पहिल्या रात्रीबाबत स्वप्ने नक्कीच असावीत पण फार जास्त उगीच्याच अपेक्षा ठेवू नका. थकव्यामुळे तुमची पार्टनरही मूडमध्ये नसेल तर यातून दोघांनाही काहीच आनंद मिळणार नाही.

पार्टनरला काय हवं हे ओळखा

पहिल्या रात्रीचा अर्थ केवळ आपल्या गरजांशी नसतो तर पार्टनरला सुद्धा तेवढंच महत्व देणं गरजेचं असतं. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्याआधी संवादातून हे जाणून घ्या की, पार्टनरला काय हवं आहे. तुमच्या अपेक्षा किंवा इच्छा त्यांच्यावर लादणे चुकीचे ठरेल. त्यामुळे वातावरण बघून पुढाकार घ्या. पार्टनरच्या गरजांना महत्व देणं देखील महत्वाचं आहे.

संवाद साधा

पहिल्याच रात्री सगळं काही केलं पाहिजे असं काही नाही. याच रात्री तुम्ही काही केलं नाही तर तुम्हाला कुणी शिक्षा देणार नसतं. तसेच अर्थातच तुमच्या पार्टनरसाठी आणि तुमच्यासाठी हे सगळं नवीन असतं. त्यामुळे आधी दोघांनी एकमेकांशी बोलून, फ्लर्ट करून दोघातील असहजता दूर करावी.


Web Title: 4 useful wedding night sex tips for newly weds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.