साताऱ्यातील महागावजवळील नदीत तरुणांकडून हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 14:42 IST2025-01-22T14:42:32+5:302025-01-22T14:42:57+5:30
सातारा शहराजवळील महागाव येथील नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केला असून पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यातील महागावजवळील नदीत तरुणांकडून हवेत गोळीबार
सातारा: सातारा शहराजवळील महागाव येथील नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केला असून पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली.
संबंधित तरुणाने नदीशेजारी गोळीबार केल्याचे समजताच सातारा शहर पोलीस तातडीने तेथे पोहोचले. त्यानंतर संबंधित तरुणाला त्यांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना नसून त्याने हवेत गोळीबार का केला याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. यापूर्वीही त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.