सातारा: उरमोडी नदीतून युवक गेला वाहून, शोध मोहिम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 14:58 IST2022-07-18T14:57:57+5:302022-07-18T14:58:22+5:30

अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही

Youth washed away from Urmodi river Satara, search operation started | सातारा: उरमोडी नदीतून युवक गेला वाहून, शोध मोहिम सुरु

सातारा: उरमोडी नदीतून युवक गेला वाहून, शोध मोहिम सुरु

अमित जगताप

नागठाणे : सातारा तालुक्यातील नागठाणे येथील उरमोडी नदीतून एक युवक वाहून गेला. मनोज सुधाकर गडकरी (वय-२८, रा. नागठाणे ता. सातारा) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल, रविवारी सायंकाळच्या सुमारास नागठाणे येथील तीन युवक उरमोडी नदी पात्रात पोहण्यासाठी आले होते. त्यातील दोघांनी नदी पात्रात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यातील एक जण वाहून गेला. सुदैवाने एक युवक बचावला.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत शोध मोहिम सुरु केली. मात्र, अद्याप वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. याघटनेबाबत नागठाणे पोलिसात फिर्याद दाखल झाली नाही. मात्र, बोरगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Youth washed away from Urmodi river Satara, search operation started