The youth was beaten and extended cash | युवकाला मारहाण करून रोकड लांबविली
युवकाला मारहाण करून रोकड लांबविली

ठळक मुद्देयुवकाला मारहाण करून रोकड लांबविलीवाढे फाट्यावरील घटना : दोन अनोळखी युवकांचे कृत्य

सातारा : येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रेयस कदम हा रात्री जेवण करण्यासाठी वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून दुचाकीवरून तो परत येत असताना त्याला दोघाजणांनी अडवले.

त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड आणि मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. जाताना अंगावर मोबाईल फेकून तेथून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या प्रकारानंतर श्रेयसने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: The youth was beaten and extended cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.