हाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:12 IST2020-02-29T18:11:10+5:302020-02-29T18:12:02+5:30

हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली.

Youth suicides by saying hi no happy states | हाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

हाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्या

ठळक मुद्देहाय ना खुश असा स्टेट्स ठेवून युवकाची आत्महत्यागळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास

सातारा : हाय ना खुश असा इन्स्टाग्रामला स्टेट्स ठेवून एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यातील शनिवार पेठेत घडली.

कन्व गजानन घाडगे (वय १७, रा. न्यू इग्लिश स्कूल परिसर, सोन्या मारूती मंदिरजवळ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कन्व याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्याचे आई-वडिल मुंबईला नातेवाईकांकडे गेले होते.

घरी कन्व आणि त्याची बहीण दोघेच होते. त्यांचा मामा साताऱ्यातच राहात आहे. या मामाकडे गुरुवारी रात्री बहीण भाऊ जेवणासाठी गेले होते. मात्र, बहीण मामाकडेच मुक्काला थांबली तर कन्व हा एकटाच घरी आला. सकाळी नाष्टा करण्यासाठी येतो, असे त्याने मामाला सांगितले होते. त्यामुळे मामाने त्याच्या मोबाईलवर बराच वेळ फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही.

मामाने घरी जाऊन पाहिले असता कन्वने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी त्याच्या आत्महत्येनंतर इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो पाहिले. यावेळी त्याने हाय ना खुश असा स्टेट्स ठेवला असल्याचे पाहायला मिळाले. हा स्टेट्स त्याने कोणासाठी लिहिला, हे मात्र अद्याप समोर आले नाही.
 

Web Title: Youth suicides by saying hi no happy states