खळबळजनक! साताऱ्यात तरुणाचा खून, घरातच लटकवलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By दत्ता यादव | Updated: July 23, 2022 11:37 IST2022-07-23T11:11:34+5:302022-07-23T11:37:53+5:30
खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

खळबळजनक! साताऱ्यात तरुणाचा खून, घरातच लटकवलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
सातारा : खूनाच्या घटनेने आज, शनिवारी सकाळी साताऱ्यात एकच खळबळ उडाली. तीस वर्षीय तरुणाचा खून करुन घरातील तुळईला त्याचा मृतदेह लटकवला होता. संदीप मच्छिंद्र दबडे (वय ३० रा. दुर्गा पेठ सातारा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संदीप दबडे या तरुणाचे खून करून त्याचा मृतदेह घरातील तुळईला लटकवल्याची घटना उघडकीस आली. तोंड, हात, पाय बांधलेल्या अवस्थेत संदीप मृतदेह आढळून आला आहे. घरातच मृतदेह आढळल्याने नेमका खून कोणी आणि कोणत्या कारणातून केला याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपास सुरु केला आहे.