शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
3
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
4
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
5
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
6
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
7
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
8
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
9
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
10
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
11
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
12
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
13
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
14
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
15
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
16
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
17
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
18
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
19
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
20
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला घेवून साताऱ्यातील विवाह सोहळ्यासाठी निघाला, ल्हासुर्णेजवळ भीषण अपघातात तरुण जागीच ठार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:04 IST

दुसरा गंभीर : महामार्गावरील निकृष्ट कामाचा ठरला बळी

कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर ल्हासुर्णे गावच्या हद्दीत रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. कार आणि दुचाकीची झालेली समोरासमोर धडक ही या महामार्गावरील निकृष्ट कामामुळे झालेला पंधरवड्यातील दुसरा अपघात आहे.वैष्णव रामचंद्र काटकर (रा. ललगुण, ता. खटाव) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित आणि सर्वपरिचित नाव असलेला युवक आहे. साताऱ्यातील विवाह सोहळ्यासाठी तो निघाला होता. त्याच्यासोबत शिरंबे येथील मित्र गौरव सुनील यादव होता. मुगाव फाटा ओलांडताच भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की वैष्णवचा जागीच मृत्यू झाला, तर गौरव गंभीर जखमी झाला.धडक होताच परिसरातील नागरिक धावून आले. शिरंबे गावात माहिती पोहोचताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. कोरेगाव पोलिसांनीही तातडीने धाव घेत दोघांनाही सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैष्णव याला मृत घोषित केले. जखमी गौरव यादव याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.या महामार्गावर करण्यात आलेले काम निकृष्ठ दर्जाचे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.गेल्या आठवड्यात याच पट्ट्यात कारने विद्यार्थिनीला चिरडले होते. त्या ठिकाणापासून आजचा अपघात केवळ एक किलोमीटरवर झाला आहे. मग कामाच्या गुणवत्तेची जबाबदारी कोण घेणार? ठेकेदार कंपनी महामार्ग नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासाठीच बांधते का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सुपरवायझरपासून ठेकेदारापर्यंत सर्वांची चौकशी करा..शिरंबे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सुपरवायझरपासून ठेकेदारापर्यंत सर्वांची चौकशी करून महामार्गाची तत्काळ तांत्रिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. . निकृष्ट कामामुळे जीव गेले तर याचा हिशेब राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांना द्यावा लागेल, असा इशारा हभप नामदेवराव भोसले यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Friend heading to wedding, killed in Satara road accident.

Web Summary : A young man died and another was seriously injured in a road accident near Satara. Vaishnav Katkar, was killed when a speeding car hit his bike. Locals blame poor road quality and demand investigation of the contractor.