शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड कापण्याच्या मशीनने तोडला मृतदेह, सातारा जिल्ह्यात अनैतिक संबंधावरून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:35 IST

पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह तिघांना अटक केली

फलटण (जि. सातारा) : अनैतिक संबंधातून तिघांनी तरुणाचा निर्घृण खून केला. त्यानंतर लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २२) फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे उघडकीस आली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्हा उघड करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.सतीश ऊर्फ आप्पा दादासाहेब दडस (वय २७, रा. सोमंथळी ता. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेखा लक्ष्मण बुधावले, लखन बंडू बुधावले, सतीश तुकाराम माने (तिघे रा. मांगोबामाळ, बुधावले वस्ती, विडणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सतीश दडस हा बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी (दि. २१) त्याचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान विडणी येथील रेखा बुधावले हिचे सुरुवातीला सतीश माने याच्याशी प्रेमसंबंध होते नंतर तिचे सतीश दडस याच्याशी संबंध निर्माण झाले. त्यातूनच दोघांत वाद निर्माण होऊन खून झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी तिघांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी रेखाने गुन्ह्याची कबुली दिली.मृतदेहाचे तुकडे करून शेततळे, नदीत टाकलेबुधवारी (दि. १४) प्रेमसंबंधाच्या कारणावरून सतीश दडस, सतीश माने व लखन बुधावले यांच्यात वाद झाला होता. यावेळी सतीशला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रुग्णालयात नेत असल्याचा बनाव करून विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.खून केल्यानंतर रात्री तिघांनी लाकूड कापण्याच्या मशीनने सतीशच्या मृतदेहाचे तुकडे करून ते दोन पोत्यांत भरले. साठेगाव हद्दीतील एका शेततळ्यात तसेच नीरा नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jealousy Turns Deadly: Man Killed, Body Dismembered in Satara

Web Summary : In Satara, a man was murdered over an affair. The killers dismembered the body with a wood-cutting machine and disposed of the pieces in a lake and river. Police arrested three suspects, including a woman, within hours.