धावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 15:33 IST2019-01-21T15:31:55+5:302019-01-21T15:33:01+5:30
मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली.

धावत्या ट्रेनमधून तोल गेल्याने युवक पटरीवर कोसळला
सातारा: मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली.
अन्सार कांताप्रसाद बालम (वय ३० सध्या रा. नागठाणे, ता. सातारा. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अन्सार हा आपल्या मित्रांसोबत रेल्वेने गावी निघाला होता.
रेल्वेत बसल्यानंतर त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला. यामध्ये त्याच्या हाता आणि पायाला गंभीर जखम झाली. त्याला रेल्वे पोलिसांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.