शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

गड संवर्धनासाठी युवकांचा जागर

By admin | Updated: February 9, 2015 00:47 IST

वसंतगडावर दोन दिवसीय कॅम्प : दुर्लक्षित ठिकाणांची डागडुजी, दीडशे जणांचा सहभाग

तांबवे : वसंतगड, ता. कऱ्हाड येथे छत्रपती संभाजीराजे गड किल्ले संवर्धन संघ व बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने गडावर दोन दिवस संवर्धन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाचे ९० विद्यार्थी व संघाचे ४० कार्यकर्त्यांनी अंदाजे दोन दिवसांत गडावर चार लाखांचे काम पूर्ण केले. कॅम्पसाठी कऱ्हाडचे रणजित जाधव व विट्याचे अ‍ॅड. विजय जाधव यांनी अर्थसहाय्य केले. या कॅम्पमध्ये गडावरील कोयना तळ्यातील काटेरी वनस्पती नष्ट करून तळ्याच्या एका बाजूस तट बांधण्यात आला. कृष्णा तळ्यावर तब्बल ३६ फूट लांब, तर बारा फूट रुंद व १८ फूट खोल बंधारा बांधण्यात आला. पुरातन काळातील सतीशिळा झाडाझुडपांनी झाकून गेल्या होत्या. त्यावरील घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यात आले. गडावरील चुना घाण्याची डागडुजी करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी गडावर सहाशे डाळिंब व आंब्याची झाडे लावली आहेत. त्यास मातीची भर घालण्यात आली. यावेळी विद्यालयाचे एन. व्ही. शिंदे, पी. डी. पाटील, डॉ. जे. ए. म्हेत्रे, एम. व्ही. पाटील, प्रा. बोलाईकर, प्रा. चौगुले, प्रा. चौबे, प्रा. रजपूत, प्रा. कांबळे, प्रा. काकडे, प्रा. मसराम, यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले. वसंतगड व तळबीडच्या ग्रामस्थांनी कॅम्पसला मोलाचे सहकार्य कले. यावेळी संघाचे अ‍ॅड. अमित नलवडे, नीलेश यादव, संतोष साळुंखे, विराज पाटील, वैभव पाटील, रामचंद्र माळी, नीलेश पाटील, अजित करंदीकर आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)