Crime News Satara: तलवार घेऊन फिरणे युवकास पडलं महागात, लोणंद पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 16:18 IST2022-04-29T16:08:31+5:302022-04-29T16:18:27+5:30
लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव बसस्थानकासमोर रात्री दोनच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना लोणंद पोलिसांना एक कार संशयित दिसल्याने त्यांनी त्या गाडीची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्यामध्ये एक लोखंडी तलवार सापडली.

Crime News Satara: तलवार घेऊन फिरणे युवकास पडलं महागात, लोणंद पोलिसांनी केली अटक
तरडगाव : गाडीत तलवार बाळगून फिरणाऱ्या तरडगाव ता. फलटण येथील एका युवकाला रात्रीच्या सुमारास लोणंद पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. गणेश विठ्ठल गायकवाड (वय ३०) असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, लोणंद-फलटण रस्त्यावरील तरडगाव बसस्थानकासमोर रात्री दोनच्या सुमारास नाकाबंदी करीत असताना लोणंद पोलिसांना एक कार संशयित दिसल्याने त्यांनी त्या गाडीची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्यामध्ये एक लोखंडी तलवार सापडली. त्यानंतर संबंधित युवकास ताब्यात घेऊन शस्त्र अधिनियमप्रमाणे त्याच्या विरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस नाईक योगेश कुंभार, फय्याज शेख, शिवाजी सावंत यांनी सहभाग घेतला. अधिक तपास श्रीनाथ कदम करीत आहेत.