लग्न कर म्हणताच प्रियकराने दिली धमकी, तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न; संबंधित तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 16:03 IST2022-03-04T15:58:35+5:302022-03-04T16:03:13+5:30

सातारा : लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध ठेवून त्रास दिल्याने तरुणीने विषारी औषध प्राशन केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात ...

Young woman ingests poisonous drug due to sexual harassment in satara | लग्न कर म्हणताच प्रियकराने दिली धमकी, तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न; संबंधित तरुणावर गुन्हा दाखल

लग्न कर म्हणताच प्रियकराने दिली धमकी, तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न; संबंधित तरुणावर गुन्हा दाखल

सातारा : लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध ठेवून त्रास दिल्याने तरुणीने विषारी औषध प्राशन केले. याप्रकरणी एकाच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणात ऋत्विक शांताराम दौडमणी (रा. सदरबझार, सातारा) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील एका तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवाचे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी देत संशयिताने तरुणीबरोबर विविध ठिकाणी शरीरसंबंध ठेवले. तसेच तरुणी लग्न कर, असे म्हटल्यावर संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली. अशा या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी औषध प्राशन केले.

याप्रकरणी तरुणीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पोलीस निरीक्षक पतंगे हे तपास करीत आहेत.

Web Title: Young woman ingests poisonous drug due to sexual harassment in satara