जागतिक रंगमंच दिन विशेष: साताऱ्याचे ‘शाहू कलामंदिर’ ठरले रंगकर्मींचे व्यासपीठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:11 IST2026-03-27T13:11:19+5:302026-03-27T13:11:51+5:30

साडेतीन दशकांची परंपरा : रंगभूमीच्या तालमीत घडताहेत अनेक कलाकार

World Theatre Day Special The Shahu Kalamandir in Satara is a dedicated platform for theater artists | जागतिक रंगमंच दिन विशेष: साताऱ्याचे ‘शाहू कलामंदिर’ ठरले रंगकर्मींचे व्यासपीठ!

जागतिक रंगमंच दिन विशेष: साताऱ्याचे ‘शाहू कलामंदिर’ ठरले रंगकर्मींचे व्यासपीठ!

सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा नगरीच्या शिरपेचात ‘शाहू कलामंदिर’ हे सांस्कृतिक मानाचे पान ठरले आहे. केवळ साताराच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील रंगकर्मींसाठी हे कलादालन आज एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. गेल्या ३९ वर्षांपासून ही वास्तू सातारकरांना दर्जेदार नाटकांची आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देत असून, अनेक दिग्गज कलाकार या रंगभूमीच्या तालमीत घडत आहेत. 

सातारा शहराला जसा पराक्रमाचा इतिहास आहे, तसाच समृद्ध सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. शहरात एका अद्ययावत नाट्यगृहाची उणीव भासत असताना, सातारा नगरपालिकेने दूरदृष्टी ठेवून शाहू कलामंदिराची उभारणी केली. १८ सप्टेंबर १९८६ रोजी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण झाले आणि सातारच्या कलाविश्वाला नवी दिशा मिळाली.

अद्ययावत मेकअप रूम, मजबूत रंगमंच आणि उत्तम आसनव्यवस्था आणि अन्य सेवा-सुविधांमुळे शाहू कलामंदिर नव्या जोमाने दिमाखात उभे आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा मोठ्या शहरांतील अनेक रंगकर्मींसाठी हे कलादालन आज हक्काचे व्यासपीठ बनले आहे.

कार्यक्रमांची मांदियाळी

  • ९०० आसनक्षमता असलेल्या शाहू कलामंदिरात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मराठी-हिंदी चित्रपट व मालिकांमधील नामांकित कलाकार आपल्या अभिनयाने सातारकर रसिकांवर मोहिनी घालत असतात.
  • दरवर्षी साधारण ५० ते ५५ व्यावसायिक नाटके, ३० ते ३५ शालेय व महाविद्यालयीन स्नेहसंमेलने येथे पार पडतात. नाटक, एकांकिका, संगीत रजनी, विविध कला स्पर्धा आणि शासकीय कार्यक्रमांसाठी हे पसंतीचे ठिकाण आहे.
  • नेटके नियोजन, उच्च दर्जाची प्रकाश व ध्वनी योजना, सुसज्ज आसनव्यवस्था आणि स्वच्छता यांमुळे हे नाट्यगृह रंगकर्मींच्या कायमच पसंतीस उतरते.

Web Title : सतारा का शाहू कलामंदिर: रंगकर्मियों का जीवंत केंद्र।

Web Summary : सतारा का शाहू कलामंदिर, 39 वर्षों से एक सांस्कृतिक पहचान, नाटकों, संगीत और स्कूली कार्यक्रमों की मेजबानी करता है। आधुनिक सुविधाओं से लैस, यह महाराष्ट्र के प्रमुख शहरों के कलाकारों के लिए एक पसंदीदा स्थल है, जो स्थापित और उभरती प्रतिभाओं के लिए एक मंच प्रदान करता है।

Web Title : Satara's Shahu Kalamandir: A Vibrant Hub for Theatre Artists.

Web Summary : Satara's Shahu Kalamandir, a cultural landmark for 39 years, hosts plays, concerts, and school events. Equipped with modern facilities, it's a favorite venue for artists from major Maharashtra cities, offering a stage for both established and emerging talents.