महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:51+5:302021-01-08T06:05:51+5:30

महाबळेश्वर : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच आज महिलांना समाजात प्रतिष्ठा आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ...

Women should take the lead in all areas | महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घ्यावी

महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडी घ्यावी

महाबळेश्वर : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच आज महिलांना समाजात प्रतिष्ठा आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचा शिक्षणाचा वसा आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायला हवा. महिलांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वच क्षेत्रात आघाडी घ्यावी, असे मत व्याख्यात्या डॉ. शुभांगी शिंदे - फलटणकर यांनी व्यक्त केले.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाबळेश्वर येथे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय महिला शिक्षण दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमालेत डॉ. शुभांगी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम सुजाता ढेबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ओवीचे गायन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर महाबळेश्वर तालुक्यात शिक्षणक्षेत्रात आदर्श कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका सुजाता ढेबे, दीपाली ढेबे, सरस्वती ढेबे, मनीषा बिरामणे, रुपाली कारंडे, ज्योती कदम, अर्चना भिलारे, नजमा कुरेशी, कमल आंब्राळे, संगीता उतेकर यांचा गौरव करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी डॉ. शुभांगी शिंदे व विविध पुरस्कार प्राप्त महिला शिक्षिकांच्या कार्याचे कौतुक केले. विष्णू ढेबे यांनी मनोगत व्यक्त केले. सुजाता ढेबे यांनी सूत्रसंचालन केले. कांचन ननावरे यांनी आभार मानले.

Web Title: Women should take the lead in all areas