शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, खोकला अन् तापानं सातारकर हैराण !

By admin | Updated: August 1, 2016 00:39 IST

विषाणूंपासून प्रसार : जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल

सातारा : सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा आजाराने सातारकर हैराण झाले आहेत. उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तर अनेकजण औषधाच्या दुकानातून गोळ्या घेऊन तात्पुरते उपचार करत आहेत. जिल्ह्यातील वातावरण गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित असल्याचे जाणवत आहे. पंधरा दिवसांपासून म्हणावा असा कोठेही पाऊस पडलेला नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असते. कडक ऊन पडलेले नसल्याने कोंदट वातावरण बनत आहे. घर, कार्यालयातही त्याच प्रकारचे वातावरण असल्याने आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कडक ऊन नसल्याने हवेतील विषाणू मरत नाहीत. तेच एकापासून दुसऱ्याला अन् दुसऱ्यापासून तिसऱ्या असा आजारांचा फैलाव होत आहे. सुरुवातील डोके दुखणे, घसा खवखवणे, सर्दी होणे यासारखी लक्षणे जाणवतात. त्यानंतर प्रचंड खोकल्याचा त्रास सुरू होतो. सर्दीमुळे कफ तयार झाल्याने वारंवार उबाळी येते. एकदा खोकला सुरू झाला तर तो थांबण्याचे नावच घेत नाही. अनेकांना रात्री कडक ताप येत आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणेही अवघड होऊन जात आहे. आपल्यापासून इतरांना फैलाव होऊ नये म्हणून अनेकजण घरात बसणेच पसंत करत आहेत. विशेष म्हणजे, आजारी पडणाऱ्यांमध्ये तरुण व प्रौढ व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे जाणवत आहे. लहान मुलं आजारी पडण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. (प्रतिनिधी) ढगांमुळे गुडघेदुखी ढगाळ वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिकांना सांधे, गुडघे दुखी यासारखे आजार डोके वर काढत आहेत. यावर फारसा इलाजही नसल्याने वेदनाशामक मलम लावूनच तात्पुरते उपचार करावे लागतात. गोळ्या पचनी अनेकांना सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंग दुखीला दवाखान्यात न जाता औषधांच्या दुकानातून गोळ्या घेण्याची सवय असते. त्यांना आता वेगळाच अनुभव येत आहे. मेडिकल दुकानदार शक्यतो कमी क्षमतेच्या गोळ्या देतात. या गोळ्या काम करत नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे दवाखान्याची पायरी चढावीच लागत आहे. या दिवसांमध्ये आजारी पडूच नये यासाठी आहारात पालेभाज्या व ‘क’ जीवनसत्त्व मिळण्यासाठी आंबट पदार्थांचा वापर करावा. तसेच बाहेर फिरताना नाका, तोंडावर रुमाल धरावे. - डॉ. धैर्यशील कुलकर्णी, सातारा.