शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

By दीपक देशमुख | Published: April 17, 2024 10:13 PM

साताऱ्यात रॅली : फडणवीस, अजित पवार राहणार उपस्थित

सातारा: जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांची टक्कर लोकसभेत होणार असल्यामुळे राज्यात या लढतीची उत्सुकता आहे. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्यानंतर आता उदयनराजे भोसले यांच्याही शक्तिप्रदर्शनाला महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तथापि, उमेदवारी मिळण्याची शक्यता असूनही पत्ता कट झालेल्या नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद या शक्तिप्रदर्शनाला मिळणार का? याची उत्सुकता वाढली आहे.

सातारा येथे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी शिरवळ ते कऱ्हाडपर्यंत रॅली काढली. तसेच उमदेवारी अर्ज भरतानाही शरद पवार, जयंत पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी ज्यांची नावे चर्चेत होती, त्या खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांच्यासह सारंग पाटील, सुनील माने हे सर्व रॅलीत अग्रभागी होते. त्यामुळे मंगळवारी खासदार उदयनराजेंच्या रॅलीची उत्सुकता वाढली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनाही आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रॅलीत शक्तिप्रदर्शनासाठी महायुतीतून ज्यांची नावे चर्चेत होती, त्यांना कसे सोबत आणणार? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. तिन्ही प्रमुख पक्षांतील नाराजांना सोबत घेण्यासाठी त्यांची समजूत काढावी लागणार आहे. प्रामुख्याने आमदार मकरंद पाटील काय भूमिका घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

तिकिटाच्या रस्सीखेचीमुळे कटुताराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला वाईत खिंडार पडले. आमदार मकरंद पाटील अजित पवार गटाला जाऊन मिळाले. यानंतर राजकीय गणिते मांडून अजित पवार यांनी सातारा जागेवर दावा सांगितला होता. नितीन पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र, उदयनराजेंनी दिल्लीत आपले वजन वापरले. अखेर साताराची जागा भाजपाने पदरात पाडून घेतली. परंतु, तिकिटाच्या या रस्सीखेचीत मकरंद आबांचे कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे.

शिंदेसेनेचीही करावी लागणार मनधरणीदुसरीकडे शिंदेसेनेचे पुरुषोत्तम जाधव हेही उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. ते अर्ज भरण्यावर ठाम आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात पक्षाचे दोन आमदार असूनही त्यांच्या उमेदवारीबाबत कुणी आग्रह धरला नसल्याची खंत त्यांना आहे. त्यामुळे ते अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांचाही विचार करावा लागणार आहे. हे सर्व जुळवून आणण्यासाठी उदयनराजे भोसले यांना कसरत करावी लागणार हे निश्चित.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४