शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

कोरेगाव : शिक्षक आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. जुन्या पेन्शन हक्क योजनेचा विषय ऐरणीवर असून, तो ...

कोरेगाव : शिक्षक आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्‍न

प्रलंबित आहेत. जुन्या पेन्शन हक्क योजनेचा विषय ऐरणीवर असून, तो सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

सातारा जिल्हा परिषदेत सोमवारी आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व

शिक्षण-अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशुसंवर्धन

समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक झाली.

त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये,

शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित

होते.

आ. शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या

शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात भेट घेऊन नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत

आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू

करण्याची मागणी केली होती. सहा लाखांपेक्षा अधिक लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्‍न असून, तो सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील

राहील. त्याबाबत काही अडचणी असल्यास त्या आम्ही लक्ष घालून निश्‍चितपणे

सोडवू.

आरोग्य विभागातील पदोन्नतीचा विषय अनेकवेळा मागे पडलेला आहे, त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोरोना काळात त्यांनी जिवाची बाजी

लावून काम केले आहे, त्यांच्यावर कदापी अन्याय होता कामा नये. प्रशासनाने

पूर्ववत पदोन्नतीचे धोरण अंमलात आणावे, अशी सूचना आ. शिंदे यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी भाग घेतला.

जिल्हास्तरावर येणार्‍या कागदोपत्री अडचणी त्वरित दूर करण्याची सूचना

यावेळी आ. शिंदे यांनी दिली.

फोटो : २३ साहील शहा

सातारा जिल्हा परिषदेत पार पडलेल्या शिक्षक आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रश्नांचा आमदार शशिकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.फोटो : २३ साहील शहा

सातारा जिल्हा परिषदेत पार पडलेल्या शिक्षक आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रश्नांचा आमदार शशिकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.