शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी

By admin | Updated: November 5, 2015 23:54 IST

पतीला तीन वर्षाची सक्तमजुरी

सांगली : पैशासाठी पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गजानन रामचंद्र खंडागळे (वय ३५, रा. महावीर रेल्वे ब्रीजजवळ, कुपवाड रस्ता, सांगली) यास दोषी धरुन तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला. तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील वंदना यांचा विवाह गजानन खंडागळेशी झाला होता. त्यांना शरयू (१२) व अर्चित (८) ही दोन मुले आहेत. गजाननला दारूचे व्यसन होते. गजानन हा त्याच्या भावासाठी झालेल्या शैक्षणिक खर्चाची रक्कम वंदनाने माहेरहून आणावी, अशी मागणी करीत होता. तसेच तिच्या आईने पवनचक्कीस विकलेल्या जमिनीतीन आलेल्या पैशामध्येही तो वाटणी मागत होता. या कारणावरून त्याने वंदनाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू ठेवला होता. मुलांनाही तो मारहाण करायचा. त्याच्या छळास कंटाळून वंदनाने १७ मार्च २०१३ रोजी पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. या खटल्यात सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले यांची नियुक्ती झाली होती. अ‍ॅड. भोसले यांनी अकरा साक्षीदार तपासले. यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक शरद जांभळे, मृत वंदनाचा भाऊ अधिकराव काशीद, आई बकुळा काशीद, शेजारची महिला सुरेखा कुलकर्णी, तपास अधिकारी शिल्पा दुथडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश खाडे व नेहा जाधव यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. गजाननला तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)साक्षीदार फितूरवंदनाची मुलगी शरयू हिची साक्ष महत्त्वाची होती. मात्र ती फितूर झाली. तसेच पंच साक्षीदार ओंकार शाम जाधव व गुरुदत्त अशोक शेंडगे हेही फितूर झाले होते. वंदनाचा मृत्युपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला.