पत्नीने घटस्फोट मागितल्याने बॅट घातली डोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:15 IST2019-05-09T19:11:08+5:302019-05-09T19:15:03+5:30

‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे,’ असे म्हटल्याच्या कारणातून पत्नीच्या डोक्यात पतीने बॅट घातल्याचा प्रकार साताºयातील तामजाईनगरमध्ये दोन

Wife laid head after asking for divorce | पत्नीने घटस्फोट मागितल्याने बॅट घातली डोक्यात

पत्नीने घटस्फोट मागितल्याने बॅट घातली डोक्यात

सातारा : ‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला घटस्फोट पाहिजे,’ असे म्हटल्याच्या कारणातून पत्नीच्या डोक्यात पतीने बॅट घातल्याचा प्रकार साताºयातील तामजाईनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र गंगाराम पवार (वय ३५,रा. यशोधन बिल्डिंग, तामजाईनगर, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. शिला राजेंद्र पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ‘तुम्ही दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे मला तुमच्यापासून घटस्फोट पाहिजे, असे म्हणाल्याच्या कारणावरून पती राजेंद्र पवार यांनी लाकडी बॅटने डोक्यात, गालावर, पाठीवर, पायावर, हातावर जबर मारहाण केली.’

 

महिलेच्या गळ्यातील लॉकेट हिसकावले

सातारा : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे लॉकेट हिसकावून नेल्याची घटना दि ८ रोजी रात्री आठ वाजता संगमनगर येथे घडली.
सुनिता अशोक वाघ (वय ५३, रा. सहकारनगर, संगमनगर सातारा) या बुधवारी रात्री दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. घराजवळ पोहोचल्यानंतर मोटारसायकलवरून दोन युवक तेथे आले. त्यापैकी एका युवकाने वाघ यांच्या गळ्याला हिसका मारून दीड तोळ्याचे लॉकेट, चेन काही क्षणातच चोरून नेली. सुमारे ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेनंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

 

Web Title: Wife laid head after asking for divorce