कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर मागवायचा पत्नीचे विवस्त्र फोटो, अन्..; कंटाळून पतीविरोधात पोलिसांकडे घेतली धाव

By दत्ता यादव | Updated: December 14, 2022 15:47 IST2022-12-14T15:01:39+5:302022-12-14T15:47:53+5:30

कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर मागवायचा पत्नीचे विवस्त्र फोटो

Wife forced to send nude photos, Fed up with the unnatural act, the wife filed a complaint in the Satara police station | कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर मागवायचा पत्नीचे विवस्त्र फोटो, अन्..; कंटाळून पतीविरोधात पोलिसांकडे घेतली धाव

संग्रहीत फोटो

सातारा: पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला तिचे विवस्त्र फोटो पाठविण्यास भाग पाडायचा. एवढेच नव्हे तर सातत्याने अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा, अखेर या साऱ्या प्रकाराला कंटाळून पत्नीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीच्या विरोधात तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहिता २४ वर्षांची असून, ती आपल्या पतीसमवेत पुणे येथे राहात होती. त्यावेळी तिचा पती घराबाहेर गेल्यानंतर पत्नीला फोन करायचा. ‘तुझे विवस्त्र फोटो पाठव’ म्हणून जबरदस्ती करायचा. त्यामुळे भीतीपोटी पत्नी त्याच्या मोबाइलवर विवस्त्र फोटो पाठवायची. असा प्रकार सातत्याने सुरू होता. 

एवढेच नव्हे तर विवस्त्रअवस्थेत पत्नीला झोपण्यास भाग पाडायचा. त्यातच वारंवार अनैसर्गिक कृत्य करून पत्नीला यातना द्यायचा. तसेच घरातील सासू, सासरेही तिचा छळ करायचे. याविकृत मानसिकतेला कंटाळून अखेर पीडित विवाहिता साताऱ्यात निघून आली. त्यानंतर तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याबाबत पोलिस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करीत आहेत. 

दरम्यान, हा गुन्हा पुणे येथे घडल्यामुळे तेथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Wife forced to send nude photos, Fed up with the unnatural act, the wife filed a complaint in the Satara police station